भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये इतिहास: पहिल्यांदाच जिंकली टी-२० मालिका!

  44


लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा अध्याय लिहिला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला पराभूत करत, भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा खरोखरच एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.



भारताचा दणदणीत विजय, मालिकेत ३-१ ची आघाडी!


भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने धमाकेदार कामगिरी केली. इंग्लंडचा ६ विकेट्सने धुव्वा उडवत भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही विजयात मोलाची भूमिका बजावली.



मानधना, शेफालीचा जलवा; हरमनप्रीत-जेमिमाचा संयमी खेळ!


इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच तुफानी फटकेबाजी करत ७ षटकांत ५६ धावांची शानदार सलामी दिली आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली. स्मृतीने ३२ धावा केल्या तर शेफालीने ३१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २४ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२६ धावा) यांनी संयमी खेळ करत भारताचा विजय निश्चित केला.


भारतीय महिला संघाने हे आव्हान केवळ १७ षटकांतच पूर्ण करत इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका नावावर केली.


Comments
Add Comment

लॉर्ड्सच्या एमसीसी संग्रहालयात सचिन तेंडुलकरला मानाचे स्थान!

लॉर्ड्समध्ये सचिन तेंडुलकरच्या चित्राचे अनावरण लॉर्ड्स: इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट मॅचच्या पहिल्या

उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांख

IND vs ENG : आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरूवात, कोण घेणार आघाडी?

लॉर्ड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १०

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला