Thursday, July 10, 2025

ICICI Prudential IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आयपीओसाठी DHRP केले दाखल!

ICICI Prudential IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आयपीओसाठी DHRP केले दाखल!

प्रतिनिधी: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीकडे त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DHRP) दाखल केले आहे. डीएचआरपी फाईलिंग मधील माहितीनुसार,१ रूपयाच्या दर्शनी मूल्यासह (Face Value) हा आयपीओ पूर्णपणे प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज लिमिटेडद्वारे १७,६५२,०९० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्रीसाठी ऑफर आहे. या ऑफरमध्ये आयसीआयसीआय बँकेचे पात्र आरक्षित समभागधारक यांच्यासाठी आयसीआयसीआय बँक समभागधारक (Shareholder) सबस्क्रिप्शन आरक्षण देखील समाविष्ट आहे.ही ऑफर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटप केले जात नाही आणि निव्वळ ऑफरच्या १५% आणि ३५% पेक्षा कमी नाही अनुक्रमे गैर-संस्थात्मक बोलीदारांना (Non Institutioanl Investors) आणि किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना (Retail Bidder) दिले जाते असे कंपनीने फाईलिंगमध्ये म्हटले आहे.


आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही आयसीआयसीआय बँक आणि प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे, जो १९९८ पासून कार्यरत आहे. सक्रिय म्युचल फंड तिमाही सरासरी व्यवस्थापनाखालील माल मत्ता (Quarterly AVERAGE Aseet Under Management QAAUM) बाबतीत ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे, क्रिसील अहवालानुसार, ज्याचा बाजार हिस्सा ३१ मार्च २०२५ पर्यंत १३.३% होता. आर्थिक वर्षातील ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीचा एकूण तिमाही म्युचल फंड QAAUM ८,७९४.१ अब्ज होता. याव्यतिरिक्त कंपनीचा भारतातील म्युचल फंडातील सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (QAAUM) कंपन्यांमध्ये इक्विटी आणि इक्विटी आधारित योजना (Eqiuity Oriented Scheme) QAAUM चा सर्वाधिक बाजार हिस्सा आहे.


क्रिसिलचा (CRISIL) अहवालानुसार कंपनीचा एकूण वाटा गुंतवणूकीचा हिस्सापैकी १३.४% होता. तसेच क्रिसील अहवालानुसार म्युचल फंड उद्योगात इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड स्कीम्स QAAUM चा सर्वाधिक बाजार हिस्सा त्यांचा होता, जो २५.३% होता. ३१ मार्च २०२५ पर्यंत वैयक्तिक गुंतवणूकदारांना (किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च-निव्वळ उत्पन्न High Net Worth असलेल्या व्यक्तींना) (वैयक्तिक गुंतवणूकदार) श्रेय जाणारी त्यांची म्युचल फंड मासिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (MAAUM) ५६५८.२ अब्ज होती. याशिवाय त्यांच्या म्युचल फंड व्यवसायाव्यतिरिक्त, त्यांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS), पर्यायी गुंतवणूक निधींचे व्यवस्थापन (AIFs) आणि ऑफशोअर क्लायंटना सल्लागार सेवा (PMS, AIF आणि सल्लागार, एकत्रितपणे अल्टरनेट्स) यांचा समावेश असलेला पर्यायी व्यवसाय देखील वाढत आहे.


क्रिसील अहवालानुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत भारतातील विवेकाधीन PMS (Portfolio Management Services)  व्यवस्थापकांमध्ये व्यवस्थापनाखालील सर्वात मोठी देशांतर्गत नॉन-कॉर्पोरेट क्लायंट मालमत्ता (AUM) होती, ज्याची क्लो जिंग (AUM) १८२.८ अब्ज होती. DRHP मध्ये नमूद केलेल्या क्रिसिलचा अहवालानुसार, २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी २१.२% बाजार हिस्सा असलेल्या, करपूर्व ऑपरेटिंग नफ्याबाबतीत ही भारतातील सर्वात फायदेशीर मालमत्ता व्यवस्थाप न कंपनी आहे.३१ मार्च २०२५ पर्यंत, ही भारतातील सर्वात जुन्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे, मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात ३० वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. ही कंपनी भारतातील म्युचल फंड (Mutual Fun d) उद्योगातील सर्वाधिक योजनांचे व्यवस्थापन करते. या १३५ योजनांमध्ये ४२ इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड योजना, २० कर्ज योजना, ५६ निष्क्रिय योजना, १४ निधी-आधारित देशांतर्गत योजना, एक लिक्विड योजना, एक रात्रभर योजना आणि एक आर्बिट्रेज योजनाचा समावेश आहे.


कंपनी तिच्या अल्टरनेट व्यवसायाअंतर्गत गुंतवणूक उत्पादने आणि सल्लागार सेवांचा एक संच (Sale) देते जी वैयक्तिक गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (बँका,विमा कंपन्या,कॉर्पोरेट्स आणि सरकारी संस्था,एकत्रितपणे 'संस्था त्मक गुंतवणूकदार' (Institutional Investors) यांचा समावेश असलेल्या) पसंती पूर्ण करते. ती तिच्या ऑफशोअर सल्लागार व्यवसायाचा भाग म्हणून गुंतवणूक सल्लागार सेवा देखील प्रदान करते आणि सध्या जपान, तैवान, हाँग काँग आणि सिंगापूरसारख्या बाजारपेठांमध्ये वितरित केलेल्या निवडक इक्विटी आणि कर्ज उत्पादनांवर ईस्टस्प्रिंग इन्व्हेस्टमेंट्स (ईस्टस्प्रिंग), प्रुडेंशियल पीएलसी (प्रुडेंशियल) मालमत्ता व्यवस्थापन शाखा यांना सल्ला देत आहे. ३१ मार्च २० २५ पर्यंत, त्याचे संपूर्ण भारतात वितरण नेटवर्क होते ज्यामध्ये २३ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये २६४ कार्यालये होती. ३१ मार्च २०२५ पर्यंत, त्याचे म्युच्युअल फंड वितरक (MFD) मध्ये १०६,४७५ संस्थात्मक आणि वैयक्तिक एमएफडी, २०९ राष्ट्रीय वितरक आणि ६४ बँका (आयसीआयसीआय बँक लिमिटेडसह) यांचा समावेश होता.


आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी लिमिटेडचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न आर्थिक वर्ष २०२४ मधील ३,७५८.२३ कोटींवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३२.४% ने वाढून ₹४,९७७.३३ कोटी झाले, हे प्रामुख्याने शुल्क आणि कमिशन उत्पन्नात वाढ झाल्यामुळे झाले आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण वार्षिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एएयूएम) वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये करपश्चात नफा २९.३% ने वाढून २,६५०.६६ कोटी रूपये झाला, जो आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २,०४९.७३ कोटी रूपये होता.


सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, एव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी परिबास, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अँडव्हायझर्स लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अँडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि यूबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर असतील असे कंपनीने अर्जात म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा