
प्रतिनिधी: इनवायरो इन्फ्रा इंजिनियर्स (Enviro Infra Engineers) कंपनीच्या समभागात आज सकाळी ६% वाढ झाली आहे. एवढी उसळी ही कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डरमुळे झाली आहे. यानंतर कंपनीच्या समभगाने सकाळी २५५ रूपये प्रति समभाग (Share) इतका उच्चांक गाठला. सहा आठवड्यातील सर्वाधिक किंमत (All time high) ठरली आहे. शेअर्समध्ये मुख्यतः झालेली वाढ ही कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डरमुळे झाली. कंपनीने एक्सचेंजला कळ वलेल्या माहितीनुसार, कंपनी Altorapro Infrastructure Pvt Ltd कंपनीबरोबर 'Enviro Infra Engineers Limited AIEPL) या नावाने भागीदारी (Joint Venture) सुरु केले. कॉमन इफ्लूअंट ट्रीटमेंट प्लांट (Common Effluent Treatment Plant CETP) या प्रकल्पाच्या सुधारीकरण, कन्स्ट्रक्शन, कमिशनिंग,ऑपरेशन्स, मेंटेनन्स या विविध कामांसाठी दोन्ही कंपन्या एकत्रित जेवी (Joint venture) सुरु करणार आहेत. यासाठी त्यांनी लेटर ऑफ इंटेट (LOI) स्वि कृत केले आहे.' असे म्हटले गेले आहे.
याविषयी नेमक्या शब्दात रेग्युलेटरी फायलिंगमध्ये काय म्हटले?
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड (AIEPL) या अल्टोराप्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सोबतच्या संयुक्त उपक्रमाला (JV) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ने कंत्राट दिले. या प्रकल्पात कोल्हापूरमधील इचलकरंजी, हातकणंगले, यड्राव कोल्हापूर येथील सहकारी औद्योगिक वसाहतींमध्ये Zero Liquid Discharge) (ZLD) प्रणालींसह सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचे (CETPs) अपग्रेडेशन समाविष्ट आहे.' या नव्या ऑर्डरमुळे सांडपाण्याचा निचरा होतानाच प्रदुषण नियंत्रणासोबतच पर्यावरण स्थिर ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. पंचगंगा नदीची डिजाइन,कन्स्ट्रक्शन, कमिशनिंग, टेस्टिंग माध्यमातून शुद्धता पुनर्स्थापित करता येऊ शकते. २४ महिन्यासाठी हा संयुक्त उपक्रम असेल. मागील महिन्यातच कंपनीने ३०५ कोटींची निविदा जिंकली होती.
कंपनी नक्की काय करते?
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स ही जल पायाभूत सुविधा क्षेत्रात ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) प्रकल्प राबविण्यात एक महत्त्वाची कंपनी असून ही १५ वर्ष जूनी आहे. कंपनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (WWTPs), पाणीपुरवठा यो जना प्रकल्प (WSSPs) यामध्ये विशेषज्ञ आहे, खासकरून कंपनी सरकारी कंत्राट अथवा सरकारी ऑर्डर घेते. कंपनीचे समभाग नोव्हेंबर २०२४ मध्ये शेअर बाजारात एनएसईवर २२० रूपयाला सूचीबद्ध झाले होते.