
प्रतिनिधी: नवीन अपडेट्सनुसार, भारताचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा अमेरिकला रवाना होणार आहे. अजूनही व्यापारात स्पष्टता न आल्याने अखेर वाणिज्य मंत्रालयाचे शिष्टमंडळ पुढील आठवड्यात युएस वॉशिंग्टन येथे ट्रम्प प्रशासनाशी भेट घेणार आहेत असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे अजूनही भारत व युएसचा भूमिकेकडे 'सस्पेन्स ' कायम आहे. परिणामी उत्सुकता अथवा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने अनेक देशावर टेरिफ ड्युटीवाढ जाहीर केली आहे. ज्यामध्ये काल आशियाई देशांतील अनेक देशावर शुल्क आकारण्यात आले. अजून भारताबाबत कुठलीही निश्चिती झाली नाही. काही मुद्यांवर बीटीए (Bilateral Trade Agreements BTA) अमेरिकेने कथितपणे केलेल्या अड वणूकीमुळे भारत सरकार दुहेरी पेचात अडकली आहे. भारताने अमेरिकेकडे १०% पेक्षा कमी टेरिफ शुल्क आकारणीसाठी विनंती केली मात्र ती मान्य केली गेली नाही. याशिवाय अमेरिकेने भारतात पीके, रूपांतरित पिके (Modified Cro ps), कुक्कुटपालनासाठी लागणारे खाद्यपदार्थ यातील निर्यातीत प्रवेश मागितला आहे. त्यामुळे तशी परवानगी दिल्यास भारतीय छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना व व्यापारी यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये युएसने २६% आयात शुल्क (Tariff) भारतावर लागू केले होते. मात्र अचानक घेतलेल्या या ट्रम्प यांच्या निर्णयांवर जागतिक पातळीवर हल्लाबोल झाला. परिणामी युटर्न घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ जुलैपर्यंत सवलती साठी मुदतवाढ जाहीर केली. आता ती १ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र यावर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. या वाढीव शुल्काचा फटका फार्मा, मेटल, उत्पादन या क्षेत्रात बसू शकतो.
मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव व शिष्टमंडळाचे प्रमुख राजीव अग्रवाल यांनी एका कार्यक्रमात यावर बोलत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,'आम्ही अनेक देशांशी यशस्वी भागीदारी केली आहे. केवळ भागीदारीच नाही तर यशस्वी भागीदारी केली आहे. नुकतेच युकेबरोबर आम्ही यशस्वी बोलणी केली. युरोपियन युनियनशी बोलणीचा अंतिम टप्प्यात आम्ही पोहोचलो आहोत. आता लवकरच अमेरिकेबरोबरील बोलणीत तोडगा काढू ' असे ते म्हणाले आहेत. याशिवाय ते आणखी म्हणाले,'अंतरिम बोलणी आता होतील. अंतिम डील ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत होईल. आतापर्यंत आम्ही २६ देशांशी बोलणी केली त्यातील १३ ठिकाणी आम्ही यशस्वी बोलणी केली.'
'युएस, ऑस्ट्रेलिया यांच्याशी यशस्वीपणे बोलणी झाल्यानंतर आता न्यूझीलंडशी चर्चा सुरू आहे. आम्ही लवकरच निष्कर्षाप्रत येऊ .' असे देखील म्हटले आहेत. यापूर्वी ते युएसमध्ये चर्चा करण्यास गेले होते. अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरी अजून तोडगा निघालेला नाही.डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध वक्तव्ये केली आहेत. सोमवारी ते म्हणाले की,' लवकरच आम्ही भारताविषयी निर्णय जाहीर करू.' त्यानंतर त्यांनी अनेक देशांवर २० ते ३०% टेरिफ शुल्कवाढ लादली. अमेरिकेच्या डॉलरविरोधात ब्रिक्स राष्ट्रांनी मोर्चेबांधणी केल्याने त्यांच्या संबंधित विकसनशील देशात आम्ही अतिरिक्त १०% शुल्क लादू असे ट्रम्प म्हणाले होते. या धमकीनंतर त्याचा फटका आशियाई बाजारात काही काळ बसला होता. आता ट्रम्प यांनी तांबे (Copper) आयातीवर ५०% कर लावल्याने धातू उत्पादकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.