Shambhuraj Desai Vs Anil Parab : "बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट चाटत होतास ..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई चौताळले, विधान परिषदेतच गदारोळ

मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शा‍ब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.



बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास


अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूराजे देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चढल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये विधान परिषदेचे काम १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातील वाद चांगलाच रंगला आहे. विधान परिषदेमध्ये मराठी माणसांच्या घरांवरून ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये अनिल परब, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अनिल परब, राजेश राठोड, हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनच चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि एकमेकाला आव्हान देण्याची भाषा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.