
इगतपुरी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्यावर झालेल्या ह्या भीषण अपघातात २ महिला आणि २ पुरुष असे ४ जण जागीच ठार झाले आहे.
भाविकांच्या इको वाहनाला सिमेंट पावडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पुढे फरफटत नेल्याने हा अपघात झाला. इको वाहनातील चार जणांचा दाबल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त सर्व रहिवासी अंधेरी मुंबई येथील असल्याचे समजते.
क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले. घोटी पोलीस, महामार्ग पोलीस, टोल नाक्याची टीम घटना स्थळी दाखल झाली आहे. अपघात ग्रस्त
भाविक मुंढेगावजवळ रामदास बाबा यांच्या मठात गुरुपौर्णिमेसाठी आले होते.