
व्हाइसरॉयने असा दावा केला की 'वेदांताला घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे वाढत्या लेव्हरेजचा वापर करावा लागला आणि राखीव निधी कमी करावा लागला, ज्यामुळे समूहाच्या प्राथमिक तारणाचे मूल्य कमकुवत झाल आहे. व्हाईसरॉयने ९ जुलै रोजीच्या त्यांच्या अहवालात वेदांताची पालक कंपनी व्हीआरएलची तुलना नेमक्या शब्दात उपकंपनी वेदांताकडून रोख रकमेच्या हस्तांतरणाद्वारे जिवंत ठेवल्या जाणाऱ्या "आर्थिक झोम्बी" किंवा "परजीवी" शी केली आहे बीएसईवर (BSE) उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मार्चपर्यंत वेदांतातील प्रवर्तक हिस्सा (Promoter Holdings) ५६.३८% आहे. उल्लेखनीय म्हणजे जवळजवळ संपूर्ण इक्विटी तारण आहे म्हणजेच शेअर्स कर्जदारांकडे तारण म्हणून आहेत.
याशिवाय रिसर्च कंपनीने असे म्हटले आहे की, मोठ्या अघोषित देणग्या पुढे ढकलल्या आणि कर्जमुक्त राहण्यासाठी नवीन कर्ज आणि लेखा समायोजनांवर अवलंबून राहिले. त्यांनी इशारा दिला की समूहव्यापी दिवाळखोरीची घटना आता दूरचा धोका नाही.' असे रिसर्च कंपनीने म्हटले आहे.
वेदान्तांने याविषयी नक्की काय म्हटले?
व्हाईसरॉय रिसर्च रिपोर्टच्या संदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात वेदान्ता समुहाने म्हटले आहे की, हा अहवाल ग्रुपला बदनाम करण्यासाठी निवडक चुकीच्या माहितीचे दुर्भावनापूर्ण नियोजन केले आहे. हा अहवाल निवडक चुकीची माहिती आणि निराधार आरोपांचे दुर्भावनापूर्ण मिश्रण आहे जे समूहाला बदनाम करण्यासाठी केले गेले आहे. खोटा प्रचार निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशाने आमच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न न करता तो अहवाल छापण्यात आला. या अहवालात विविध माहितीचे संकलन आहे - जे आधीच सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहे, परंतु लेखकांनी जाणूनबुजून बाजारातील प्रतिक्रियेतून नफा कमावण्यासाठी संदर्भाला खळबळजनक (Sensational) बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
अहवालाचे टाईमिंग संशयास्पद आहे आणि ती आगामी कॉर्पोरेट उपक्रमांना कमजोर करण्यासाठी डाव असू शकतो. आमचे भाग भांडवलधारक (Stakeholders) अशा युक्त्या समजून घेण्याइतके समजूतदार आहेत. खरं तर, कोणतीही जबाबदारी टाळण्यासाठी, अहवालाच्या लेखकांनी विविध अस्वीकरण (Disclaimer) जोडले आहेत की हा अहवाल केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी तयार केला गेला आहे आणि त्यांचे मत व्यक्त करतो. आम्ही व्यवसाय आणि वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि सर्वांना अटकळ आणि अप्रमाणित आरोप टाळण्याची विनंती करतो ' अशा शब्दांत वेदांन्ता समुहाने नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी गौतम अदानी यांच्यावर युएस शॉर्ट सेलर हिंडनबर्गने अदानी समुहावर समभागावरील हाताळणी व पैशाचे गैरव्यवहार याविषयी गंभीर आरोप केले होते. मात्र अदानी समुहाने हे सगळे आरोप भारतीय बाजाराविरूदध हे षडयंत्र असल्याचे म्हणत त्यात काही तथ्य नसल्याचे सांगितले होते. यानंतर अदानी यांच्यावर झालेल्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नव्हते.