
बाजारात उघडतानाच बीएसई मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९%, ०.३८% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१८%,०.५५% वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सुरूवातीला दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा आज घसरण होताना दिसत आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २१५.७८ अंकांने घसरला आहे. बँक निफ्टीत १६१.२५ अंकाने घसरला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये सत्राच्या सुरुवातीला कंज्युमर ड्युरेबल्स (०.७१%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.४४%), एफएमसीजी (०.४०%), फार्मा (०.३८%), हेल्थकेअर (०.३८%), ऑटो (०.१६%) समभागात वाढ झाली. सुरूवातीला सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.९२%), खाजगी बँक (०.३०%), आयटी (०.४७%), मेटल (०.३०%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.१३%) या समभागात झाली.
आज वीआयएक्स अस्थिरता निर्देशांकात (VIX Volatility Index) मोठी घसरण झाली आहे. थेट वीआयएक्स २.९३% घसरला आहे. भारतासह ब्रिक्स देशात टेरिफ वाढ मंगळवारी रात्री घोषित केली. त्यामुळे भारतासह विकसनशील देशां ना आता १०% अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. याचा सर्वात जास्त फटका फार्मा, स्टील क्षेत्रात बसणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांनी डॉलर घसरण्यासाठी योजना केल्याचा आरोप केला. मंगळवारी अमेरिकन बाजारतही त्यांचे पडसाद उमटले ज्यामध्ये अमेरिकन बाजारात थोडी घसरण झाली होती.
सकाळच्या सत्रात सायरमा एसजीसटेक (५.४२%), एलगीटेक इक्विपमेंट (४.७७%), गार्डनरीच (४.७६%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (३.०५%), इंजिनियर्स इंडिया (२.४३%), हिताची एनर्जी (२.३%), एसीएमई सोलार (२.२८%), पिरामल फार्मा (२.१७%), वरूण बेवरेजेस (१.८८%), एशियन पेंटस (१.४३%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.२६%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.१४%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.२६%), आयसीआयसीआय प्रोडुंशियल (०.९६%), चोलामंडलम फायना न्स (०.८६%), ट्रेंट (०.९२%), अदानी एनर्जी सोल्यूशन (०.७०%), श्रीराम फायनान्स (०.६१%), डाबर इंडिया (०.६०%) या समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण युनियन बँक (४.७६%), फिनिक्स मिल्स (३.९२%), झी एंटरटेनमेंट (२.३९%), सुंदरम फायनान्स (१.९५%), गोदरेज प्रॉपर्टी (१.७१%), कजारिया सिरामिक (१.४९%), जेल इंडिया (२.२७%), टाटा स्टील (१.६७%), एचसीएलटेक टेक्नॉलॉजी (१.४९%), वेंंदाता (१.२५%), जिंदाल स्टील (१.०२%), झायडस लाईफसायन्स (०.८५%), सिमेन्स एनर्जी (०.६१%), टेक महिंद्रा (०.५८%), डिएलएफ (०.४९%), सनफार्मा (०.२३%) या समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील ट्रेंडवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,'अलीकडील जागतिक बाजारातील ट्रेंडमधून एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की बाजार मोठ्या प्रमाणात टॅरिफ फ्रंटवरील आवाजाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि स्पष्टता येण्याची वाट पाहत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तांब्याच्या आयातीवर ५०% टॅरिफ, फक्त ब्रिक्समध्ये राहण्यासाठी १०% टॅरिफ, १ ऑगस्टची अंतिम मुदत वाढवू नये आणि एक वर्षाच्या वाढीव कालावधीसह औषध आयातीवर संभाव्य २००% टॅरिफ ... या सर्व घोषणा बाजारांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत कारण ट्रम्प यांनी त्यांच्या घोषणा बदलण्याचा आणि बदलण्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला आहे. थोडक्यात, बाजार व्यापार आघाडीवर स्पष्टता येण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच, निफ्टी ज्या श्रेणीत व्यापार करत आहे त्याच श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.
कदाचित, जवळच्या काळात बाजाराच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचे म्हणजे पहिल्या तिमाहीचे निकाल. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीच्या कमाई वाढीच्या गतीसह मिडकॅप्स सुरू राहण्याची शक्यता आहे. लार्जकॅप्सची कमाईची वाढ हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे, परंतु काहीही नाट्यमय नाही. बँकिंग नावे पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत चांगली संख्या नोंदवतील. सिमेंट सेगमेंट काही हिरवीगार पालवी दाखवत आहे.'
सुरुवातीच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले,'सलग तिसऱ्या दिवशी, २० दिवसांच्या एसएमएच्या खाली घसरल्यानंतर निफ्टी पुन्हा वर चढला. त्याचा बंद पाच दिवसांतील सर्वोच्च आहे, ज्यामुळे आम्हाला मोठ्या हालचालींच्या संभाव्यतेसाठी खुले राहण्यास प्रोत्साहन मिळते. या आठवड्यात आतापर्यंत, गती निर्देशकांकडून मिळालेल्या खराब सिग्नलमुळे आम्ही मर्यादित वरच्या दिशेने पाहण्यास प्राधान्य दिले होते. २५५८८-६५० क्षेत्र आव्हानात्मक राहील, परंतु ते देण्याची शक्यता जास्त असेल, २५७३०-८५० हे प्रारंभिक वरच्या दिशेने (Vertical Rise) लक्ष्य म्हणून उघड करेल आणि त्यानंतर २६२०० येईल. उभ्या वाढीची अपेक्षा कमी आहे, परंतु आम्ही २५४४० च्या वर जाईपर्यंत त्यासाठी तयार राहतो. असे करण्यात अयशस्वी झाल्यास २५३००-२४९२० हे उघड होईल.'
एकूणच परिस्थिती पाहता बाजारातील बँक निर्देशांकाशिवाय फार्मा, मेटल या समभागावर लक्ष केंद्रित महत्वाचे ठरू शकते.