
कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली शहराची अवस्था आणखीच विकट झाली आहे. कल्याण पश्चिमेसाठी घंटागाड्या नसल्याने इतर प्रभागातील कचरा उचलून झाला तरच, कल्याण पश्चिमेकडील कचरा उचलला जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. अनेक रहिवासी संकुलात दोन ते तीन दिवस घंटागाड्या फिरकत नसल्याने रस्त्यावर कचऱ्यांचे डीग साचले असून, रस्त्यावर कचऱ्यांच्या डब्याच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या पोर्टलवर नागरिकांनी कचऱ्यांचे फोटो आणि तक्रारीचा पाऊस पाडला आहे.
कल्याण डोंबिवली शहरात कचऱ्याचा चेन्नई पॅटर्न राबवत शहर स्वच्छ आणि नीटनेटके करण्यासाठी वर्षाला ८६ कोटी इतकी तगड़ी रक्कम मोजून पालिका प्रशासनाने मे. एन्को प्लास्ट या कंपनीची नियुक्ती केली आहे. शहरातील ७ प्रभागातील कचरा गोळा करून तो उचलून प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी या कंत्राटदारावर देत पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून शहर महिन्याभरात स्वच्छ केले जाणार असल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकाच्या माची ९०० रुपयांचे कचरा संकलन शुल्क थोपले आहे.
दरम्यान जुन्या कंत्राटदाराने काम बंद केल्याने पालिकेला घंटागाड्या आणि आरसी गाडांचा तुटवडा जाणवत असून एका प्रभागातील कचरा उचलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाड्या दुपारच्या सत्रात दुसऱ्या प्रभागातून फिरवल्या जातात अनेकदा सकाळपासून काम करणारे कर्मचारी दुपारपर्यंत कंटाळतात यामुळे दुपारच्य सत्रात अनेक भागात गाड्या पोचत नसल्याने कल्याण पश्चिमेकडील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कल्याण पश्चिमेकडील व आणि क प्रभागात जुन्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कचरा उचलला जात होता. आता पालिकेच्य माध्यमातून या भागातील कचरा उचलला जात असला तरी या प्रभागासाठी कचरा उचलणाऱ्या गाड्या नसल्याने या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
उंबर्डे, वाडेघर, गोदरेज यासारख्या उच्चभ्रू सोसायट्या मधील कचरा मागील तीन दिवसापासून उचलण्यात आलेला नसल्याने सोसायट्याच्या कचरा कुंड्या रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्या असून भटक्या कुत्र्यांनी कचरा रस्त्यावर पसरवला असून पावसामुळे कचरा कुजल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. याच कचऱ्यातून नागरिकांना ये जा करावी लागत असल्याने नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी शेकडो तक्रारी महापालिकेच्या पोर्टलवर केल्यानंतर संध्याकाळी उशिरा कुंड्यामधील कचरा उचलून नेण्यात आला असला तरी रस्त्यावर पसरलेल्या कचर्याचा बकालपणा कायम असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्ये बाबत केडीएमसी चे माजी नगरसेवक मोहन उगले मांनी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वर्कशॉपला भेट दिली असता, वर्क शॉप मध्ये उभ्या केलेल्या कचऱ्याच्या