Wednesday, July 9, 2025

कार्यालयीन वेळेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल, मुंबईतील डबेवाल्यांकडून भीती व्यक्त

कार्यालयीन वेळेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल, मुंबईतील डबेवाल्यांकडून भीती व्यक्त

कांदिवली (वार्ताहर) : कार्यालयाच्या वेळेत बदल झाल्यास जेवणाच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईतील डबेवाल्पांची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मा आनुषंगाने, कार्यालयाच्या वेळेत बदल करा मात्र दुपारच्या जेवणाची वेळेत शक्य तो बदल करू नये अशी मागणी मुंबई डबेवाल्यांकडून करण्यात येणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.


मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे लोकल रेल्वेत प्रचंड गर्दी होते. ही समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यात यावा तसेच राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १८१० लोकल फेल्या त्यांतून ३५ लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. डबेवाला उन्हाळा वा पावसाळा असो वेळेत जेवणाचे डबे पोहोचवितात, मात्र जेवण्याच्या वेळेत बदल झाल्यास, तुटपुंज्या उपन्नासाठी जीवाचे रान करणाऱ्या डबेवाल्यांना तारेवरची नाहक कसरत करावी लागेल, वेळेचे नियोजन न जमल्याने, काही ग्राहक कमी होतील, तसेच काही कमी करावे लागतील यामुळे मासिक उत्पन्नामध्येदेखील घट होऊ शकते अशी भीतीही काही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment