इस्रायलचे अधिकाऱ्यांसह सैनिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश

जेरुसलेम : इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता सैन्य दलातील सर्व अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना अनिवार्यपणे कुराण आणि अरबी भाषा शिकावी लागणार आहे, यामध्ये कोणालाही सूट मिळणार नाहीये, इस्रायलच्या सरकारने तसे आदेश जारी केले आहेत.याशिवाय इस्रायल आपल्या अभ्यासक्रमामध्ये देखील कुराण आणि अरबी भाषेचा समावेश करणार आहे.


इस्रायलच्या सरकारी चॅनलकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासकडून इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणाने केलेल्या चुकीमुळे हा हल्ला झाल्याचं मानलं जातं आहे, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, जर सैन्य अधिकारी आणि मोसादच्या अधिकाऱ्यांना अरबी भाषा येत असती तर हा हल्लाच झाला नसता, त्यामुळे आता इस्रायलने आपल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर अरबी भाषा शिकावी असे आदेश काढले आहेत.


माहितीनुसार, इस्रायल चारही बाजूंनी मुस्लिम राष्ट्रांनी वेढलेला आहे. इस्रायलच्या शेजारी जॉर्डन, तुर्की, साऊदी, यमन आणि लेबनान सारखे देश आहेत. ज्या देशांमध्ये अरबी भाषा बोलली जाते, फक्त इस्रायलच असा एकमेव देश आहे, जिथे हिब्रू भाषा बोलली जाते.


इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे, इराणकडून देखील इस्रायलवर कधीही हल्ला होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. इराणमध्ये देखील अनेक लोक अरबी बोलतात, त्यामुळे इस्रायलकडून आता या भाषेची सक्ती आपल्या अधिकाऱ्यांवर करण्यात आली आहे.


इस्रायलचे जे टॉप कमांडर आहेत त्यांना अरेबी भाषेचं ज्ञान आहे, त्यामुळे ते भाषेच्या जोरावर शत्रू राष्ट्राचे अनेक प्लॅन डीकोड करतात, मात्र इस्रायलमधील सैनिकांचा जो दुय्यम स्थर आहे, त्यांना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यांना आता अरबी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या