Wednesday, July 9, 2025

IPO update marathi : Asston Pharmaceuticals व CFF Fluids कंपनीचा IPO आजपासून बाजारात काय आहे कंपनी आणि पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन जाणून घ्या एका क्लिकवर!

IPO update marathi : Asston Pharmaceuticals व CFF Fluids कंपनीचा IPO आजपासून बाजारात काय आहे कंपनी आणि पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन जाणून घ्या एका क्लिकवर!
प्रतिनिधी: आज ऍस्टन फार्मास्युटिकल लिमिटेड (Asston Pharmaceuticals Limited), तसेच सीएफएल फ्लूईड कंट्रोल लिमिटेड (CFF Fluid Control FPO) या दोन कंपन्याचे आयपीओ बाजारात दाखल होत आहे.एसएमई (SME) प्रवर्गात हे दाखल होतील.

जाणून घेऊयात दोन्ही आयपीओची माहिती -

१) Asston Pharmaceuticals Limited - कंपनीचा आयपीओ (IPO) आजपासून म्हणजेच ९ ते ११ जुलै कालावधीत बाजारात उपलब्ध असणार आहे. कंपनीने आयपीओसाठी ११५ ते १२३ रूपये प्रति समभाग इतका प्राईज बँड (Price Band) निश्चित केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २७.५६ कोटींचा आयपीओ असणार आहे ज्यामध्ये २२.४१ लाखांचे फ्रेश इश्यू समभाग (Stocks) विक्रीसाठी असतील.

किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी कमीत कमी २३०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. समभागांचा एक गठ्ठा (Lot) १००० समभागांच्या असेल.  Sobhagya Capital Options Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Maashitla Securities Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार असेल. मार्केट मेकर (Market Maker) म्हणून (JSK Securities and Services Private Limited) कंपनी काम पाहणार आहे.

पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १४ जुलैपर्यंत होऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ १६ जूलैला बाजारात सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. बीएससी एसएमई (BSE SME) यावर आयपीओ सूचीबद्ध होईल. एकूण २२४१००० शेअर्सपैकी ११३००० समभाग मार्केट मेकरसाठी आरक्षित असतील उर्वरित गुंतवणूकीची उपलब्ध असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी (५.०४%), पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी ४७.३०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) १४.३७%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) (३३.२९%) वाटा उपलब्ध असेल.

कंपनीबद्दल -

डॉ आशिष साकळकर, सायली मोरे, सचिन बढाक हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांणे एकूण भागभांडवल ६८.७६% आहे ते सूचीबद्ध झाल्यानंतर ५०.६६% होणार आहे. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ७.८१ कोटी रुपये उभारले आहेत. २०१९ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनी प्रामुख्याने फार्मास्युटिकल क्षेत्रात कार्यरत आहे. हेल्थकेअर उत्पादन परकीय बाजारात निर्यात करण्यास या कंपनीची खासियत आहे. वेगवेगळ्या प्रकारची औषधे, टॅब्लेट, क्यापसुल, सिरप व तत्सम उत्पादने बनवते .

कंपनीची आर्थिक परिस्थिती -

Asston Pharmaceuticals कंपनीचा महसूल ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान ६२% वाढला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात २१८% वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीतील माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात (Revenue) मार्च २०२५ मधील २५.६१ कोटींच्या तुलनेत घसरण होत मे २०२५ पर्यंत महसूल (Revenue) ६.२१ कोटी मिळाला होता. याशिवाय कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२५ मध्ये ४.३३ कोटींच्या तुलनेत घसरण होत मे २०२५ पर्यंत १.३२ कोटी नफा मिळाला होता.

कंपनीच्या करपूर्व नफा (EBITDA) ३१ मार्च २०२५ मधील ६.१६ कोटींच्या तुलनेत घसरण होत ३१ मे २०२५ पर्यंत १.९३ कोटी मिळाला होता. कंपनीणे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १०४.७० कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirement), थकबाकी चुकवण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्या त येणार आहे.

किती मिळाले सबस्क्रिप्शन -

पहिल्या दिवशी कंपनीच्या आयपीओला एकूण ०.२३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.३८ वेळा, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.२० वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे अजून पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारकडून कुठलेही सबस्क्रिप्शन मिळालेले नाही.

२) CFF Fluid Control Limited - सीएफएफ कंपनीचा ८७.७५ कोटीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओत १५ लाख समभागांचा फ्रेश इश्यू असणार आहे. आज ९ जुलै ते ११ जुलै पर्यंत हा आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी २३४००० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीने ५८५ रूपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला आहे. Aryaman Financial Services Limited कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून आयपीओसाठी करेल. Cameo Corporate Services Limited आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Aryaman Capital Market Limited काम पाहेल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५००००० शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. मार्केट मेकरसाठी ७८००० समभाग आरक्षित असतील. इतर गुंतवणूकदारांसाठी उर्वरित समभाग विक्रीसाठी असणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ५.२०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) ४७.४०%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) यांच्यासाठी ४७.४०% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.

कंपनीबद्दल -

सुनिल मेनन, गौतम मकेर हे या कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल ७३.३१% होते ते कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर ६८.०६% येणार आहे. कंपनी प्रामुख्याने सबमरिन मशिनरी, क्रीटिकल कंपोनंट, संरक्षण सामग्री बनवते. ज्यामध्ये फ्लूईड कंट्रोल सिस्टिम, एअर पॅनल, हाय प्रेशर एअर सिस्टिम अशी तत्सम उत्पादने कंपनी बनवते.

कंपनीची आर्थिक परिस्थिती -

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान ३७% वाढ झाली. कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२५ पर्यंत ४०% वाढ झाली आहे. मार्च २०२४ मधील १०६.९८ कोटींच्या तुलनेत कंपनीचा महसूल वाढत मार्च २०२५ पर्यंत १४६.१० कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ मधील १७.०९ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ पर्यंत २३.८५ कोटींवर वाढ झाली होती. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मार्च २०२४ मधील ३०.८५ कोटींच्या तुलनेत वाढ होत मार्च २०२५ पर्यंत नफा ४१.३१ कोटींवर पोहोचला होता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirement), दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.

पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन?

पहिल्या दिवशी कंपनीला दुपारपर्यंत ०.२७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.०५ पटीने, ०.४९ पटीने विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) मिळाले आहे. अजून पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारकडून (FII) सबस्क्रिप्शन मिळालेले नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >