
त्यामुळे २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ९८१८ रूपये आहे तसेच २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९०००, व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७३६४ रूपये आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ६६० रूपयांनी घसरत ९८१८० रूपयांवर, २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ६०० रुपयांनी घसरत ९०००० रूपयांवर व १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४९० रूपयांनी घसरत ७३६४० रूपयांवर पोहोचली आहे.
दुपारपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.६०% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये ०.५१% घसरण झाल्याने एमसी एक्सवरील दरपातळी ९५९७९.०० रूपयांवर पोहोचली आहे. आज युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३७% घसरण झाली आहे. देशभरातील मुंबई, पुण्यासह बहुतांश शहरात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९८१८ रूपयांवर कायम आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९००० रूपयांवर व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४२५ रुपयांवर आहे.
युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०% टेरिफ अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा सोन्याला प्रामुख्याने फटका बसला. मुख्यतः डॉलर वधारल्याने सोन्याच्या मागणीतही घट झाली होती. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात इत क्यात शक्य नसली तरी प्रामुख्याने अनपेक्षित पेरोल डेटात अमेरिकेने दुपटीने प्रगती दर्शविली असल्याने बाजारातील सोन्यावर दबाव सुरु होता. सततच्या चढउतारीनंतर काल सोन्याच्या दरात वाढ झाली आज तेच सोने पुन्हा घसरले आहे.
चांदीच्या दरात चौथ्यांदा स्थिर!
चांदीच्या दरात स्थिरता आल्याने सतत चढउतार असलेल्या चांदीच्या दरात मात्र सलग चौथ्यांदा स्थिरताच आहे. प्रामुख्याने डॉलरच्या तुलनेत रूपयात गेल्या आठवड्यात वधारला असल्याने चांदी किंमतीला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली. गेल्या दोन आठवड्यात घसरत असलेला डॉलर कालपासून वाढल्याने पुन्हा चांदीत हालचाल होऊ शकते.सोन्याच्या व चांदीच्या दरातील भारतीय किंमत आगामी काळातील डॉलर व मागणीवर अवलंबून असेल तत्पूर्वी देशांतर्गत घटत असलेल्या मागणीचा परिणामही चांदीच्या दरात दिसून आला. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचे दर प्रति ग्रॅम ११० रूपयांवर कायम आहेत.चांदीची किंमत ११०००० रूपये प्रति किलो दरावर स्थिरावली आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात (Silver Future Index) यामध्ये आज कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे चांदी पातळी ३६.७३ प्रति औंसवर कायम आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीचा निर्देशांक ०.२३% घसरत १०७७४०.०० रूपयांवर पोहोचला आहे.