मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

  55


मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार!


मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी!


मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी मार्वल शासकीय कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित Smart Fish Stock Assessment System (SFSS) विकसित करण्याचा करार करण्यात आला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.


यावेळी डॉ. एन. रामास्वामी, सचिव (पदुम), किशोर तावडे, आयुक्त मत्स्यव्यवसाय, मार्वल शासकिय कंपनीचे संचालक साई कृष्णा व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पादन, वितरण आणि विकासाला गती मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागात प्रथमच AI Technology चा वापर करण्यात येणार आहे. याअंतर्गत Smart Fish stock Assessment system (SFSS) विकसित करण्यात येत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे मत्स्य व्यवसाय हे राज्यातील पहिले मंत्रालय असणार आहे. Al Technology चा वापर करून जलाशय विकसित करणे, मत्स्योत्पादनाची आकडेवारी, तसेच माहितीचे संकलन करून त्याचा वापर विविध विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

ST कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार मंगळवारपूर्वी मिळणार, एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे यावर्षी ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार का? हे पाहावं लागणार आहे. कारण राज्य

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन गणपतीपूर्वी होणार

राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्‍या

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांसाठी मेट्रोची खास भेट; पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहणार पुणे मेट्रो, कशी असणार वेळ? जाणून घ्या

पुणे : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून, पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी लाखो

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला

नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात “पाळणा” योजना 

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा मुंबई: राज्यातील नोकरदार महिलांच्या