
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार!
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी!
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी मार्वल शासकीय कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित Smart Fish Stock Assessment System (SFSS) विकसित करण्याचा करार करण्यात आला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.
यावेळी डॉ. एन. रामास्वामी, सचिव (पदुम), किशोर तावडे, आयुक्त मत्स्यव्यवसाय, मार्वल शासकिय कंपनीचे संचालक साई कृष्णा व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पादन, वितरण आणि विकासाला गती मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागात प्रथमच AI Technology चा वापर करण्यात येणार आहे. याअंतर्गत Smart Fish stock Assessment system (SFSS) विकसित करण्यात येत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे मत्स्य व्यवसाय हे राज्यातील पहिले मंत्रालय असणार आहे. Al Technology चा वापर करून जलाशय विकसित करणे, मत्स्योत्पादनाची आकडेवारी, तसेच माहितीचे संकलन करून त्याचा वापर विविध विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.