Sunday, October 26, 2025
Happy Diwali

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?
मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १० जुलैपासून ऐतिहासिक अशा लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. टीम इंडियाने एजबेस्टन कसोटी जिंकून 'तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी' मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामुळे उर्वरीत तीन सामन्यासाठी रोमांच निर्माण झाला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉईस क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे, जिथे मागील दौन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर संस्मरणीय विजय मिळवला होता. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीत जसप्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्यामुळे, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर बुमराह आणि सिराज या दोघांचा सामना करणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. बुमराह आणि सिराज या दोघांनाही आजवर लॉईसच्या मैदानावर प्रत्येकी एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. बुमराहने येथे खेळलेल्या एका सामन्यातील दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना ३७.३३ च्या सरासरीने एकूण ३ बळी मिळवले आहेत. दुसरीकडे, सिराजची आकडेवारी अधिक प्रभावी दिसते. सिराजने दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना केवळ १५.७५ च्या उत्कृष्ट सरासरीने ८ बळी घेतले आहेत. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सिराजला गोलंदाजीत विशेष यश मिळाले नव्हते, मात्र एजबॅस्टन कसोटीत त्याने आपल्या लय साधली आणि शानदार पुनरागमन करून एकूण ७ फलंदाजांना पॅव्हेलिपनचा रस्ता दाखवला होता. दरम्यान, बुमराह आणि सिराज यांच्या व्यतिरिक्त, लॉर्ड्स कसोटीमध्ये तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपच कामगिरी अत्यंत प्रभावी ठरल होती, ज्यात त्याने एकूण १० बळ मिळवण्याची किमया साधली होती त्यामुळे लॉर्ड्सवर त्याची गोलंदाज कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लॉर्ड्सवर भारताला केवळ ३ विजय

आतापर्यंत भारतीय संघाने लॉर्ड्सवर एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी केवळ ३ सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले आहे, तर १२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ सानने अनिर्णित राहिले आहेत.
Comments
Add Comment