
चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वायुसेनेचं एक पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला मिळाला आहे.
विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली. ...
२ मृतदेह आढळल्याची माहिती
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान क्रॅश झाल्यानंतर शेतामध्ये आग लागली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह सापडला, त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरुच ठेवल्यानंतर दुसरा मृतदेह देखील सापडल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाली आहे.
Indian Air force fighter jet crashed near Ratangarh Churu Rajasthan.
One Pilot Lost life.
Pray for other pilots 🙏#planecrash #IndianAirForce pic.twitter.com/2xvo8nlqDS
— Nandini Idnani 🚩🇮🇳 (@nandiniidnani69) July 9, 2025
२०० फूट परिसरात पसरला विमानाचा मलबा
भारतीय हवाई दलाचं विमान का कोसळलं यासंदर्भातील सविस्तर कारण नंतर स्पष्ट होईल. चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या माहितीनुसार सैन्य दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ते विमान झाडावर कोसळलं, त्यामुळं झाड देखील जळून गेलं. या ठिकाणी दोन मृतदेह आढळतात.दुर्घटनास्थळी हवाई दलाचं पथक दाखल झालं आहे. विमानाचा मलबा एकत्र करण्याचं काम केलं जात आहे. भारतीय हवाई दलात १६० जग्वार विमानं आहेत. त्यापैकी ३० विमानांचा वापर प्रशिक्षणासाठी केला जातो.
दरम्यान आतापर्यंत घटनास्थळी एक मृतदेह आढळून आला आहे. मात्र जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानात नक्की किती लोकं होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. अपघाताच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं अपघातस्थळी गर्दी केली होती, या विमानामध्ये एक किंवा दोन लोक असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.