मला विचारल्याशिवाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना दिले हे स्पष्ट आदेश

  72

मुंबई: राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आज मीरारोड येथे मनसेकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून आज राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे की त्यांना विचारल्याशिवाय अथवा त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही विधान सोशल मिडिया अथवा मीडियासमोर करू नये.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून मनसे पदाधिकारी तसेच नेत्यांना हे आदेश दिले आहेत. पाहा काय म्हणालेत राज ठाकरे,

एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.

राज ठाकरे ।


५ जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले होते. यावेळेस मुद्दा होता तो मराठीचा. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकाच मंचावर दिसले होते.
Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक