राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून मनसे पदाधिकारी तसेच नेत्यांना हे आदेश दिले आहेत. पाहा काय म्हणालेत राज ठाकरे,
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
राज ठाकरे ।
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
५ जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले होते. यावेळेस मुद्दा होता तो मराठीचा. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकाच मंचावर दिसले होते.