Tuesday, July 8, 2025

ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी वेटिंग लिस्ट, १० जुलैपासून सुरू होणार सेवा

ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी वेटिंग लिस्ट, १० जुलैपासून सुरू होणार सेवा

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता मावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण बादीच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.


सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, कोच आणि चर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात आणि मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटष्पाच्या ४ तास आधी प्रसिद्ध केले जातात. रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १० जुलै २०२५ पासून, ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केला जाईल.



सुधारित चाटिंग वेळा :


पहिली आरक्षण यादी त्या ट्रेनच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार केली जाईल.
दुसऱ्या आरक्षण चार्टसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही.
अंतिम आरक्षण पार्ट ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल,
प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >