विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून गदारोळ


सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी रिकामी खुर्ची, विरोधकांचा बहिष्कार!


मुंबई: विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज मंगळवारी (८ जुलै) जोरदार गदारोळाने झाली. एका बाजूला महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा विधानमंडळातर्फे सत्कार होणार असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उचलला. यावरून विधानसभा अक्षरशः दणाणून गेली.



भास्कर जाधवांचा आक्षेप: "सरन्यायाधीशांच्या स्वागताला विरोधी पक्षनेता नसेल!"


दिवसाची सुरुवात होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, "जेव्हा महाराष्ट्र विधानमंडळ महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे स्वागत करेल, तेव्हा विरोधी पक्षनेत्याची जागा मोकळी असेल आणि विरोधी पक्षाला त्यांचे स्वागत करता येणार नाही. आजपर्यंत १० टक्के सदस्य संख्येची अट सांगितली जात होती, पण ती अट कुठेही नाही."



मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणि अध्यक्षांचा 'लवकरच निर्णय' पवित्रा


यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा, त्यानंतर आपण चर्चा करू," असे सांगितले. विधानसभा अध्यक्षांनीही, "विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय हा अध्यक्षाचा आहे. माझ्या दालनात यावर चर्चा झाली आहे. तरीही तुम्ही सभागृहात हा विषय मांडणे योग्य नाही. मी कायदा, प्रथा परंपरा यांचा विचार करून निर्णय घेईन," असे स्पष्ट केले.



"लोकशाहीचा गळा घोटला जातोय!" विरोधकांचा संताप


अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांचा संताप कायम होता. भास्कर जाधव यांनी, "आज सरन्यायाधीश येत आहेत, तेव्हा लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, हे आम्ही दाखवून देऊ," असे आक्रमकपणे म्हटले. जयंत पाटील यांनी अध्यक्षांना, "तुम्ही किती काळ विचार करणार आहात? किती वेळ लागतो?" असे विचारत, "अध्यक्ष म्हणून भूमिका घेण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे, पण देवेंद्र फडणवीस तुम्ही ते करू देत नाही," असा थेट आरोप केला.



"आम्ही इथे बसणार नाही!" म्हणत विरोधकांचा सभागृह त्याग करण्याचा निर्णय


यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची किती दिवस रिकामी ठेवणार आहात? सरन्यायाधीश गवई यांचे आगमन होत आहे, पण या परिस्थितीत आम्ही इथे बसणार नाही. आम्ही सभागृह त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे."


या गदारोळानंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या रिकाम्या खुर्चीवरून आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.


Comments
Add Comment

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.