Monday, October 20, 2025
Happy Diwali

Trump Tarrif : ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, १४ देशांवर लादला ४० टक्क्यांपर्यंत टॅक्स

Trump Tarrif : ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, १४ देशांवर लादला ४० टक्क्यांपर्यंत टॅक्स
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्क(टॅरिफ)ची घोषणा केली. सर्वाधिक ४० टक्के टॅरिफ म्यानमार आणि लाओस या देशांवर लावण्यात आला आहे. हे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. ट्रम्प यांनी या नव्या टॅरिफची माहिती आपले सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून दिली. त्यांनी सांगितले की या निर्णयाशी संबंधिक अधिकाधिक पत्रे संबंधित देशांच्या नेत्यांना पाठवण्यात आली आहेत. ट्रम्प यांनी टॅरिफ पत्रांची लाट असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा १४ देशांना इशारा

ट्रम्प यांनी १४ देशांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रांमध्ये कडक शब्दात इशारा दिला आहे की जर त्यांनी या बदला म्हणून अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवले तर अमेरिका आणखी तितकेच शुल्क वाढवेल. त्यांनी स्पष्टपणे लिहिले की जर तुम्ही एखाद्या कारणानी टॅरिफ वाढवला तर तुम्ही जितके टक्के वाढवला त्यावर तितकाच अतिरिक्त टॅक्स जोडू.

कोणत्या देशांवर किती टॅक्स

१.म्यानमार- 40% २. लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक (लाओस)- 40% ३. कंबोडिया- 36% ४. थायलंड- 36% ५. बांगलादेश- 35% ६. सर्बिया- 35% ७. इंडोनेशिया- 32% ८. दक्षिण अफ्रीका- 30% ९. बोस्निया आणि हर्जेगोविना- 30% १०. जपान- 25% ११. कजाखस्तान- 25% १२. मलेशिया- 25%
Comments
Add Comment