पालघर : पालघर जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम करण्यासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्र आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यपालनविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मत्स्य किसान दिनाचे औचित्य साधून १० जुलै रोजी आधुनिक मत्स्यपालन या विषयावर ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात आले आहे. इच्छुक मत्स्यपालक, नवीन उद्योजक, तरुण-तरुणी आणि शेतकरी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागींना मत्स्यपालनाशी संबंधित विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन मिळेल. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. आपली जागा निश्चित करण्यासाठी <https://forms.gle/4myYcQii4TaQ955D> या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. हा उपक्रम जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देईल आणि स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे द्वार उघडेल अशी अपेक्षा आहे.






