
जगभरातील युजर्सना सोशल मीडिया, चॅटिंगसाठी सतत इंटरनेटची गरज भासते. पण आता जॅक डोर्सीच्या नवीन प्रोजेक्टमुळे हे समीकरण बदलणार आहे. 'बिटचॅट' हे एक डिसेंट्रलाइज्ड, प्रायव्हसी-केंद्रित मेसेजिंग अॅप असून ते ब्लूटूथ लो एनर्जी (बीएलई) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
काय आहे 'बिटचॅट' ?
'बिटचॅट' हे एक पीअर-टू-पीअर चॅटिंग अॅप आहे. यामध्ये कोणताही केंद्रीय सर्व्हर नसतो. यामुळे सेन्सॉरशिप किंवा इंटरनेट बंदीमुळे अॅपवर परिणाम होत नाही. मोबाईल नंबर, ईमेल याचीही आवश्यकता नसते, ज्यामुळे प्रयोगकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित राहते.
हे अॅप कसं काम करतं?
ब्लूटूथ मेश नेटवर्क वापरून हे अॅप जवळच्या डिव्हाइसेसना कनेक्ट करतं.
एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला थेट मेसेज पाठवतो.
मल्टी-हॉप सिस्टमद्वारे लांब अंतरावरील मेसेज दुसऱ्या डिव्हाइसेसद्वारे फॉरवर्ड होतो.
मेसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत तात्पुरत्या मेमरीत स्टोअर होतो.
300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर देखील हे नेटवर्क कार्यरत राहतं.
सुरक्षा आणि प्रायव्हसी बाबतीत कितपत विश्वासार्ह?
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन : कर्व्ह 25519 आणि एईएस-जीसीएम अल्गोरिदमचा वापर.
कोणताही फोन नंबर किंवा ईमेलची गरज नाही.
कोणताही सर्व्हर नाही, त्यामुळे अॅप पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आणि सुरक्षित.
सध्या कुठे उपलब्ध आहे?
'बिटचॅट' सध्या अॅपल टेस्टफ्लाइट वर आयओएस युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मसाठीही ते लॉन्च करण्यात येईल.
जॅक डोर्सीचा हा 'वीकेंड प्रोजेक्ट' असला तरी, 'बिटचॅट' चं तंत्रज्ञान आणि संकल्पना भविष्यातील इंटरनेट-मुक्त संवादाच्या क्रांतीकडे मोठं पाऊल ठरू शकतं.