Tuesday, July 8, 2025

Numerology: पैशांमध्ये खेळतात या ४ तारखांना जन्मलेले लोक, नशिबात असतो भरपूर पैसा

Numerology: पैशांमध्ये खेळतात या ४ तारखांना जन्मलेले लोक, नशिबात असतो भरपूर पैसा
मुंबई: अंकशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी १ ते ९ अंकापर्यंत निर्धारित केलेल असते. याला मूलांक असे म्हणतात. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून हा मूलांक काढला जातो. तज्ञांच्या मते मूलांकाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचे भाग्य तसेच नशिबाची माहिती मिळवता येते.

अकंशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ४ असतो त्यांची कमी वयातच श्रीमंत होण्याची शक्यता अधिक असते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.

अंकज्योतिषांच्या मते मूलांक ४ असलेले लोक सुरूवातीपासून मनी मॅनेजमेंटमध्ये हुशार असतात. या लोकांचे जीवन श्रीमंतीत जाते. मूलांक ४चे लोक ज्ञान, मेहनत आणि पूर्ण योजनेने यश मिळवण्यात तरबेज असतात. हे लवकरच आपले लक्ष्य मिळवतात.

मूलांक ४ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. त्यामुळे हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कोणत्याही पेशामध्ये हे सहज मिसळून जातात. असे मानले जाते की मूलांक ४ असलेले लोक इंजीनियर, वैज्ञानिक, डिझायनर तसेच वकीलसारख्या पेशामध्ये चांगली कामगिरी करतात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >