
प्रतिनिधी: सेबी (Security Exchange Board of India SEBI) नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १.०५ लाख कोटींचे नुकसान जेन स्ट्रीट प्रकरणात झाले आहे. जेन स्ट्रीट या कथित घोटाळ्याप्रकरणी सेबीने कारवाई करत अमेरिकन ऑप्शन्स ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटवर बाजारातून ट्रेडिंग प्रतिबंध केला होता. हेच प्रकरण ताजे असतानाच मिळालेल्या माहितीनुसार, फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) या ट्रेडिंग प्रकारात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७५००० कोटींचे नुकसान व नंतर ३६५०० कोटींचे नुकसान झाले आहे.
जेन स्ट्रीटने अनैतिक हाताळणी करत कृत्रिम नफेखोरी केली होती. ज्यामध्ये ३६५०० कोटींचा अनाधिकृत नफा कंपनीने कमावला होता. गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये वाढ होत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मधील या ट्रेडर्सची संख्या ८६.३ लाख होती ती यावर्षी वाढत ९६ लाखांवर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या संख्येत गुंतवणूकदार एफ अँड ओ (F&0) डेरिएटिवमध्ये येत असताना जेन स्ट्रीटने छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे (Retail Investors) मोठे नुकसान केले आहे.
मागील आठवड्यात सेबीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करुन जेन स्ट्रीटवर गंभीर आरोप केले होते. सेबीने त्यांची गंभीर दखल घेतली. मूलतः जेन स्ट्रीटने कॅश इक्विटी, स्टॉक फ्युचर, इंडेक्स फ्युचर, इंडेक्स ऑप्शन या प्रकारात कंपनीने कृत्रिम नफा कमावला होता. सेबीने दखल घेतल्याने सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी कठोर शब्दांत यावर भाष्य केले होते ज्यात त्यांनी सेबी दोषींवर अथवा असे गैरव्यवहार करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करणार आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुरळीत करण्यासाठी बाजारातील पारदर्शकता टिकावी यासाठी सेबीची करडी नजर घोटाळ्यावर आहे.' असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, जेन स्ट्रीटने (Jane Street) कंपनीकडून सेबीवर नाराजी व्यक्त केली आहे. जेन स्ट्रीटने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की ते भारतातील वित्तीय नियामकाने केलेल्या बंदीला ते आव्हान देतील, ज्याने अमेरिकन उच्च-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग जायंटवर बाजारातील हेरफेर केल्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्या प्रश्नातील पद्धती मूलभूत निर्देशांक आर्बिट्रेज ट्रेडिंग आहेत असे कंपनीने भारतीय नियामक मंडळ सेबीला उद्देशून म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातमीनुसार आठवड्याच्या शेवटी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत ईमेलनुसार, जेन स्ट्रीटने म्हटले आहे की ते सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून 'अत्यंत दाहक' आरोपांमुळे निराश झाले आहेत आणि औपचारिक प्रतिसादावर काम करत आहेत असे जेन स्ट्रीटने अधिकृतपणे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात नियामकाने आरोप केला होता की जेन स्ट्रीटने जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान इंडेक्स ऑप्शन्स ट्रेडिंगद्वारे ४३,२८९.३३ कोटी रुपये कमावले होते आणि फर्मला ४,८४३.५७ कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्या चे निर्देश दिले.पुढील सूचना येईपर्यंत या गटाला भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय जेन स्ट्रीटने आपण संपर्क साधल्यास सेबीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नव्हता असे जेन स्ट्रीटने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, जेन स्ट्रीटचे पुढील पाऊल कदाचित सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करणे असेल.' त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.