Tuesday, July 8, 2025

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

पुणे : पुणे शहरातील डेंग्यूचे रूग्ण वाढत असून, डासांचा वाढता डंख पुणेकरांच्या आरोग्याची डोकेदुखी वाढवत आहे. गेल्या पाच महिन्यांत जेवढे डेंग्यू रूग्णसंख्या नोंदवली, तेवढी संख्या एकट्या जूनमध्ये नोंदवली. यामुळे नागरिकांनी डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावी, स्वच्छता पाळावी असे आवाहन पालिकेने केले आहे.


पावसाळा सुरू होताच साथीचे आजार डोके वर काढतात. सर्दी, खोकला, ताप, घसा आदी आजारांनी नागरिक हैराण होतात. त्यातच डेंग्युच्या डासांची पैदासही वाढते. पावसामुळे सोसायटी, गोडाऊन, पडकी घरांसह अन्यत्र पाणी साचून डासांची पैदास वाढू लागते. एडिस इजिप्ती या डासांपासून डेंग्यू होण्याची भीती अधिक असते.


जानेवारी २०२५ मध्ये पालिका कार्यक्षेत्रात डेंग्युचे ३९ रूग्ण आढळले. फेब्रुवारीत ३१ रूग्ण सापडले. त्यानंतर पुढील तीन महिने उन्हाळ्यामुळे रूग्णसंख्या काहीशी घटली. यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आणि जून महिन्यात डेंग्यू रूग्णांची संख्या १२३ वर पोहचली.जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ११ नवीन डेंग्यूचे रूग्ण सापडले. गेल्या आठवड्यात चिकनगुनिय़ाचे दोन संशयीत रूग्ण सापडले. त्यामुळे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन पालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.राजेश दिघे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >