
प्रतिनिधी: आज काही कंपन्यांच्या एक्स डिव्हिडंट (Ex Dividend) गुंतवणूकीसाठी आज शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक्स लाभांश (Ex Dividend) कमावण्यासाठी अखेरचे काही तास उरले आहेत. आज ८ जुलैला या कंपन्याचे एक्स लाभांश जाहीर केल्याने आजपर्यंतच ज्या गुंतवणूकदारांनी समभाग (Shares) खरेदी केल्यास त्यावर कंपनीने यापूर्वी जाहीर केलेला लाभांश संबंधित लाभार्थीला मिळू शकतो. उद्यापासून मात्र समभाग खरेदी केल्या स मात्र Ex Dividend मिळू शकत नाही.
कुठल्या शेअरवर आज एक्स डिव्हीडंटसाठी अंतिम तारीख -
१) टायटन कंपनी- टायटन कंपनीने आज आर्थिक वर्ष २०२५ मधील एक्स लाभांश ११ रूपये लाभांश जाहीर केला. या लाभांशचा वितरणामुळे कंपनीचे ९७६ कोटी खर्च होणार आहेत. कंपनीने यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) मध्ये कंपनीने या लाभांशाची घोषणा केली होती. या बैठकीच्या निष्कर्षानंतर पुढील ७ दिवसात लाभांश समभाग गुंतवणूकदारांना मिळणार आहे असे कंपनीने सांगितले आहे.
२) जेके सिमेंट- जेके सिमेंटने एक्स लाभांश जाहीर केला होता. आर्थिक वर्ष २०२५ साठी कंपनीने १५ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला.
३) जेएसडब्लू स्टील - जेएसडब्लू स्टीलने प्रति समभाग २.८ रुपये प्रति समभाग (Stock) लाभांश जाहीर केला. २५ जुलैला ही बैठक होणार आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर ३० दिवसात हा लाभांश मिळणार आहे.
४) अडोर वेल्डिंग - अडोर वेल्डिंग कंपनीने प्रति समभागावर २० रुपये लाभांश जाहीर केला आहे. आज याचीही अंतिम एक्स लाभांश मुदत आहे.
५) आदित्य व्हिजन लिमिटेड - कंपनीने १.१ रूपयांवर प्रति समभाग लाभांश जाहीर केला होता. ८ जुलैपूर्वी पात्र भागभांडवलधारकांना लाभांश मिळेल.
६) सोलार इंडस्ट्रीज - कंपनीने अंतिम लाभांश १० रूपये प्रति समभाग निश्चित केला होता. पात्र गुंतवणूकदारांना हा लाभांश मिळेल असे कंपनीने म्हटले.
७) बॉम्बे ऑक्सिजन - कंपनीने एकूण प्रति समभागावर ३५ रूपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
८) इंजरसोलरांड इंडिया लिमिटेड (Ingersoll Rand India) - प्रति समभागात २५ रूपये लाभांश जाहीर केला आहे.
९) प्लास्टिब्लेंडस इंडिया लिमिटेड - कंपनीने प्रति समभाग २.५ रूपये लाभांश जाहीर केला आहे.
१०) मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर बोनस शेअर - कंपनीने एकास एक बोनस समभाग घोषित केला आहे. ८ जुलै ही रेकोर्ड (नोंदणी तारीख) म्हणून निश्चित केली आहे. या तारखेला पात्र समभाग धारकांना बोनस शेअर मिळतील.
वरील कंपन्यांच्या समभागात आजपर्यंतच गुंतवणूक केल्यास त्याचा लाभांश मिळणार आहे.