
महाराष्ट्राच्या विधीमंडळाशी वडिलांचे ३० वर्षांचे नाते होते. आता याच इमारतीत सत्कार स्वीकारतोय, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भारताचे समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंचावर उपस्थितीत दोन्ही सभागृहाचे गटनेते आणि प्रतोद, मंत्रिमंडळातील सर्व सन्मानीय सदस्य, विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य आणि माजी सदस्य, बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा", या शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाषण सुरू केले. सरन्यायाधीशांच्या भाषणाची सुरुवात ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"मी महाराष्ट्रात जिथे जिथे काम केलं होतं तिथे सत्कार स्वीकारणार असं ठरवलं होतं. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर... हा शेवटचा सत्कार समारंभ आहे. पण याचं महत्त्व माझ्या मते अनन्यसाधारण असं आहे. हा फक्त दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या बारा कोटी ८७ लाख जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे. असं मी समजतो. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो", असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. याआधी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भूषण गवई यांची ...
कोण काय म्हणाले ? महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपल्या राज्याचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे देशाचे सर न्यायाधीश झाले
भूषण गवई हे सर न्यायाधीश. झालेत त्यांचा सत्कार करायला हवा असे आम्ही ठरवले
भूषण गवई यांच्यामध्ये साधेपणा आहे
दादा साहेब गवई यांचा विधिमंडळाशी वेगळा संबंध होता
समाजातील प्रत्येक व्यक्तीला दादा साहेब यांच्याकडे जाता येत होते आज भूषण गवई देखील तसेच आहेत
गवई ज्यावेळी सरकारी वकील होते तेव्हा नागपूर झोपडपट्टीचा विषय होता नागपूरचे सर्व आमदार चिंतेत होते मात्र गवई यांनी तो प्रश्न सोडवला
वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती मात्र गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला
त्यांनी लँडमार्क जजमेंट दिलं आणि त्याचा फायदा झाला
हायकोर्टात असताना ही वकिलांच्या बाजूने ते असायचे
आजही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना तीन चतुर्थांश मतदान होईल
एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात
दिक्षाभूमी उभी करण्याचं काम दादासाहेब यांनी केलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे
आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय
भूषण गवई यांनी चौदा मे रोजी शपथ घेतली
कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले
देशाला एक अस्सल हिरा मिळालाय
एवढ्या मोठा पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली
सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व.
उपमुख्यमंत्री अजित पवार
आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले पण आजच्या सत्काराची विधिमंडळामध्ये ऐतिहासिक नोंद होणार आहे
आजच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती
प्राथमिक शाळेतील मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यायचे की नाही असा वाद आता सुरू आहे
लोकशाहीला अधिक बळकट करणारी अशी व्यवस्था आहे
लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठी जबाबदारी ही सरन्यायाधीश यांची असते.
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद
भूषण गवई यांचा आपण सत्कार करतोय
दोन्ही सभागृहाचा मी एकटाच विरोधी पक्ष नेता आहे
काल परवा कुणी तरी मराठी बद्दल बोललं पण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे भूषण गवई यांनी दाखवून दिलेय
मराठावाडा आणि विदर्भातली माती काही वेगळी नाही
भूषण गवई आपल्या देशाचे सरन्यायाधीश झालेत
सरकार विधिमंडळ आणि न्याय पालिका समतोल असायला हवे
भूषण गवई यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत घेतले
मराठी भाषेत शिक्षण घेतलेला व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच पदावर जाऊ शकतो हे भूषण. गवई यांनी दाखवून दिले
कायद्यानुसार न्याय देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे
आज राज्याची मराठी म्हणून लता मंगेशकर यांनी नाव उज्ज्वल केलेय