Capgemini WNS Acquistion: कॅपजेमिनी कंपनीकडून भारतात महत्वाकांक्षी निर्णय थेट डब्लूएनएस कंपनीचे अधिग्रहण करणार!

प्रतिनिधी: सध्या सर्वात चर्चेला असलेले नाव कॅपजेमिनी (Capgemini) आहे. कारणही तसेच आहे. जगभरातील प्रसिद्ध फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतात महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. तीन लाखांहून अधिक भारतीय कर्मचारी असलेल्या आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील बिझनेस प्रोसेसिंग मॅनेजमेंट कंपनी असलेल्या डब्लूएनएस (WNS) कंपनीचे अधिग्रहण (Acquisition) करणार आहे. यापूर्वी कॅपजेमिनी आयगेट (Igate) नावाच्या भारतीय आयटी कंपनी चे ४ अब्ज डॉलर्सने अधिग्रहण केले होते. आता भारतातील आघाडीची प्रोसेसिंग सोलूशन डब्लूएनएसचे अधिग्रहण करण्याचे ठरवले. विशेषतः सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) तंत्रज्ञानाला अन्यनसाधारण महत्व आल्याने माहिती तंत्रज्ञानात त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या अधिग्रहणातून आयटी कंपनी कॅपजेमिनी डब्लूएनएस पटाईत असलेल्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाला झळाळी आणण्यासाठी हे अधिग्रहण करणार आहे असे कंपनीने म्हटले होते.


आकडेवारीनुसार,स्वतः डब्लूएनएसचे भारतात ६६००० कर्मचारी आहेत त्यात भारतात ४४००० हून अधिक कर्मचारी आहेत. आता हे अधिग्रहण केल्याने जवळपास १.२ अब्ज डॉलरचा अतिरिक्त महसूल कॅपजेमिनीला मिळू शकतो.


फ्रेंच आयटी सेवा कंपनी कॅपजेमिनीने त्यांच्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये परिवर्तन करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी एजंटिक एआय ऑफरचा फायदा घेण्यासाठी तंत्रज्ञान आउटसोर्सिंग कंपनी WNS ला $3.3 अब्ज रोख रकमेवर खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. WNS शेअर किंमत ७६.५० डॉलरपर्यंत ३ जुलै रोजीच्या शेवटच्या बंद किंमतीच्या तुलनेत १७% प्रीमियम दर्शविला गेली आहे आणि त्यात भारत-आधारित WNS चे आर्थिक कर्ज समाविष्ट नाही, असे कॅपजेमिनीने सोमवारी सांगितले.


या अधिग्रहणासह, कंपनीने म्हटले आहे की,' कॅपजेमिनीचे उद्दिष्ट एक सल्लागार व्यवसाय (Consulting Business) सेवा तयार करणे आहे जी उद्योगांना जनरेटिव्ह एआय आणि एजंटिक एआय द्वारे त्यांच्या ऑपरेशन्समध्ये सुधारणा कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यावर केंद्रित आहे, जे "महत्त्वपूर्ण" गुंतवणूक आकर्षित करेल असे म्हटले आहे. 'डब्लूएनएस त्याची उच्च वाढ, आकर्षक मार्जिन आणि लवचिक (Flexible) डिजिटल बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस आणते तर अमेरिकन बाजारपेठेत आमचे एक्सपोजर आणखी वाढवते,' कॅपजेमिनीचे सीईओ आयमन एज्जत यांनी निवेदनात म्हटले आहे.


डब्लूएनएसने गेल्या तीन आर्थिक वर्षात ९% याहून अधिक महसूल वाढ दर्शविली होती तर कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत महसूल आकडेवारी १.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या