Tuesday, July 8, 2025

जन्मदाखला घोटाळा, मालेगावात चौथा गुन्हा दाखल

जन्मदाखला घोटाळा, मालेगावात चौथा गुन्हा दाखल
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी पोलिस ठाण्यात मंगळवारी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच तक्रार दिली होती. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या चार झाली आहे.

बोगस जन्मदाखले प्रकरणी यापूर्वी छावणी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आता मंगळवारी मनपा आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी तक्रार दिली असून, यात अज्ञात व्यक्तीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडील जन्मनोंदणी आदेशाप्रमाणे बनावट जन्मनोंद आदेश बनविले तसेच तहसीलदार कार्यालयांचे शिक्का, सील जावक क्रमांक, सही करून जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडून जन्मनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करत शासनाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मालेगाव नायब तहसीलदार यांनी दिलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.

बनावट जन्मदाखले दाखवून ४० जणांनी काढले पासपोर्ट

बनावट जन्मदाखले प्रकरणात आतापर्यंत २१७ जण फरार असून, ४० जणांनी याच जन्म प्रमाणपत्राद्वारे पासपोर्टही काढल्याचे समोर आलेले आहे. तर महापालिकेचे जन्म-मृत्यू विभागाचे उपनिबंधक अब्दुल तव्वाब यांना याच प्रकारणात यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा