
मोर्चात येण्यापूर्वी काशिगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेले मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची मंत्री सरनाईक यांनी स्वतः तातडीने सुटका केली. त्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात जाऊन मनसे व एकीकरण समितीच्या इतर कार्यकर्त्यांची ही त्यांनी सुटका केली आणि त्यानंतरच ते मराठी मोर्चात सहभागी झाले होते. काल रात्री उशिरा पोलिसांकडून करण्यात आलेल्या गैरवर्तवणुकीबाबत मंत्री सरनाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या अटकेबाबत सविस्तर चर्चा केली.
व्यापाऱ्यांकडून काढण्यात आलेला मोर्चा जसा शांतप्रकारे पार पडला तसाच आजचा मोर्चा देखील शांतप्रकारे पार पडणार होता. परंतु हा मोर्चा होण्याआधीच पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. पोलिसांकडून हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले गेले नसल्याकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

मनसेच्या मोर्चात मंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न, मराठी मोर्चात नेमकं काय घडलं?
मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आज मराठी मोर्चा काढला आला. ...
या संपूर्ण घटनेवर मंत्री सरनाईक यांची स्पष्ट भूमिका
“जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा मी पद विसरून मराठी माणसाच्या बाजूने उभा राहीन. मी या मोर्चात कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सहभागी झालो. माझ्यावर घोषणा करून काहीजण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी माझी जबाबदारी पार पाडली. मराठी माणसासाठी, त्याच्या हक्कासाठी आणि शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मी मराठी माणूस म्हणून हि माझी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असण्याचे समजतो. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मात्र, मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर कुणीही अन्याय करू शकत नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. जिथे मनसे-उबाठाचे कार्यकर्ते असतील तिथे माझ्या नावाचे गुणगान गायले जातील अशी अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे. मी मराठी एकीकरण समितीला शब्द दिलं होता कि, मी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मिरा-भाईंदरमध्ये आयोजित मोर्चात सामील होईल आणि तो दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे. जेव्हा - जेव्हा प्रश्न मिरा-भाईंदरमधील मराठी माणसाचा असेल तेव्हा तेव्हा मी मराठी माणूस म्हणून त्यांच्यासोबत उभा राहीन. मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी” अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.