अदानी पॉवरने या अधिग्रहणातून १८१५० मेगावॉटपर्यंत आपली उर्जा निर्मिती क्षमता वाढवली आहे. सध्या अदानी पॉवर लिमिटेड आपल्या कंपनीचा धोरणात्मक विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे अधिग्रहणातून आपल्या ब्राऊनफिल्ड व ग्रीनफिल्ड या प्रकल्पातील पोर्टफोलिओत वाढ करण्यासाठी कंपनी इच्छूक असल्याचे म्हटले जात आहे. १८ जूनला एनसीएलटी (National Company Law Tribunal NCLT) मुंबई खंडपीठाने या निर्णयाला मंजुरी दिली.
त्यानुसार ७ जुलैला अधिकृतपणे ही योजना संमत झाली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनी १६०० मेगावॉट क्षमतेचे विविध ब्राऊनफिल्ड प्रकल्प बांधत आहेत ज्यामध्ये मध्यप्रदेश, रायपूर , रायगड, कोरबा, कवाई या विविध ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय मिर्झापूर उत्तर प्रदेश येथे सुरू केला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना,'अदानी पॉवरने ६०० मेगावॅट विदर्भ वीज खरेदी पूर्ण केली,' भारित मालमत्तेच्या पुनरुज्जीवनाद्वारे मूल्य अनलॉक करण्याच्या अदानी पॉवरच्या धोरणात व्हीआयपीएलचे अधिग्रहण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत असताना, देशाच्या शाश्वत विकासाला चालना देणारी विश्वासार्ह, परवडणारी बेस-लोड पॉवर प्रदान करून 'सर्वांसाठी वीज' या भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत' असे अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसबी ख्यालिया म्हणाले.
याविषयी प्रतिक्रिया देताना कंपनीने म्हटले आहे की,' या अधिग्रहणामुळे कंपनीची ऑपरेटिंग क्षमता १८,१५० मेगावॅटपर्यंत वाढली आहे, असे कंपनीने पुढे सांगितले. 'एपीएल ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या मिश्रणाद्वारे त्यांच्या बेस लोड पॉवर जनरेशन पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे.' एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरचे अधिग्रहण आणि रिझोल्यूशन प्लॅन अंमलबजावणी ४,००० कोटींच्या एकूण मोबदल्यात पूर्ण केली आहे. दुपारपर्यंत अदानी पॉवर लिमिटेडकचा समभाग ०.४२% वाढला आहे.