OYO Hotels मध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का दिली जाते?

मुंबई: OYO हॉटेल्सच्या वाढत्या चैनीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने याकडे लक्ष द्यावं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनात म्हंटले आहे.  या हॉटेल्ससाठी ग्रामपंचायत, नगर परिषद,महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही,  या हॉटेल्समध्ये नेमकं काय चालतं? हा अभ्यासाचा विषय आहे, असं ते पुढे म्हणाले.


महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरु असताना ओ-वाय-ओ नावाच्या हॉटेल्सची चैन तयार झाली आहे. शहराच्या २०-२० किलोमीटर दूर, निर्जन ठिकाणी हे OYO हॉटेल आहेत. मनात शंका आली की हे हॉटेल्स नेमके काय आहेत? तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचं लक्षात आलेलं आहे.


मुनगंटीवार पुढे म्हणाले, सरकारने या हॉटेल्सकडे लक्ष द्यावं. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा एक पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे.



संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा


''ओ-वाय-ओ' च्या माध्यमातून वीस-वीस किलोमीटर कुणीही प्रवाशी जाऊन राहात नाही. एखादा प्रवासी तिथे गेला तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे, असं समजावं. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला खूप खर्च येतो. त्या पैशात शहरात चांगली रुम मिळेल.'' असं म्हणत मुनगंटीवार पुढे बोलले की, खरंतर संस्कृती रक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा. गृह राज्यमंत्र्यांनी याची माहिती घ्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित