Wednesday, July 9, 2025

Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजाराची सांगता सापशिडीसारखी न होता संथ ट्रेनप्रमाणे! सेन्सेक्स व निफ्टीत लूटपूटू वाढ डोनाल्ड ट्रम्प यांचा आडमुठेपणा जबाबदार का आणखी काही? जाणून घ्या सविस्तर

Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजाराची सांगता सापशिडीसारखी न होता संथ ट्रेनप्रमाणे! सेन्सेक्स व निफ्टीत लूटपूटू वाढ डोनाल्ड ट्रम्प यांचा आडमुठेपणा जबाबदार का आणखी काही? जाणून घ्या सविस्तर

मोहित सोमण:आज बाजाराची सांगता ही सापशिडीसारखी न होता आगगाडीच्या डब्याप्रमाणे झाली आहे. सकाळ ते संध्याकाळ बाजार 'सपाट' राहिले व अखेर धक्कास्टार्ट करून करून अखेरीस बाजारात किरकोळ वाढ झाली आहे.सेन्से क्स ९.६१ अंकाने वाढत ८३४४२.५० पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ०.३० अंकांने वाढत २५४६१.३० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स (०.१%) व निफ्टीत (०.००%) मार्जिनल फरक खूपच कमी ठरला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८५.८४ अंकाने घसरण होत निर्देशांक ६३५७५.९९ पातळीवर तर बँक निफ्टी ८२.७० अंकाने घसरत ५६९४९.२० पातळीवर पोहोचला.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१५ व ०.३३% नुकसान झाले आहे. तर निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७, ०.४४% घसरण झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) यामध्ये सगळे समभाग मंद राहिले. त्यामुळे सपाट पातळीच्या आसपासच त्यांनी आपली रूपरेषा आखली होती. आज सर्वाधिक वाढ एफएमसीजी (१.६८%), तेल व गॅस (०.४१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.०२%) समभागात झाली. तर सर्वाधिक घसरण मिडस्मॉल टेलिकॉम (१.०७%) मध्ये, तसेच मिडिया (१.०३%), फार्मा (०.०९%), मेटल (०.६१%), आयटी (०.७६%) समभागात झाली आहे.


बाजारात किरकोळ वाढ झाली असली तरी आज बीएसईत (BSE) मध्ये ४२६१ समभागापैकी १७०७ समभागात (Stocks) वाढ झाली आहे तर २३६४ समभागात घसरण झाली. एनएसईत (NSE) ३०६० समभागातील ११५४ समभागात वाढ तर १७९५ समभागात घसरण झाली आहे. बीएसईचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४६१.०१ लाख कोटी रुपये तर एनएसईचे एकूण बाजार भांडवल ४५९.०४ लाख कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे बीएसईत आज केवळ १६ समभाग अप्पर सर्किटवर असले तरी एनएसईत मात्र आज ११५ समभाग अप्पर सर्किटवर दिसले आहेत.


आज अखेरीस जेपी पॉवर (१९.५३%), गोदरेज कंज्युमर (६.३३%), मेट्रोपोलिस हेल्थ‌‌‌ (४.८६%), बीएलएस इंटरनॅशनल (३.७५%), डाबर इंडिया (३.५६%), नुवामा वेल्थ (३.२६%), हिंदुस्थान युनिलिव्हर (३.०४%), डाबर इंडिया (३.५६%), आयसीआयसीआय प्रोडनशियल (२.३२%), अदानी पॉवर (२.११%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.९५%), होंडाई मोटर्स (१.८०%), वरूण बेवरेजेस (१.७३%), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (१.२४%), कोटक महिंद्रा (०.९४%), रिलायन्स (०.९३%), आयटीसी (०.८७%), टाटा कंज्युमर प्रोडक्ट (१.१२%), मदर्सन (०.८७%), अपोलो (०.८३%), ट्रेंट (०.७९%), अदानी पोर्टस (०.७९%), बँक ऑफ बडोदा (०.१३%) या समभागात वाढ झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण दीपक फरर्टिलायझर (५.८४%), इन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी (४.८४%), सीपीसीएल (४.२४%), एमआरपी एल (३.९८%), गार्डन रिच (२.७८%), आधार हाउसिंग फायनान्स (२.३९%), इन्फो ऐज (३.७२%), हेवेल्स इंडिया (२.५४%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.४४%), टेक महिंद्रा (१.८९%), स्विगी (१.७९%), ओएनजीसी (१.५२%), अल्ट्राटेक सिमेंट (१.२९%), बजाज हाउसिंग फायनान्स (१.१७%), इटर्नल (१.०९%), हिंदाल्को (१.०५%), मारूती सुझुकी इंडिया (१.००%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.६९%), अदानी एंटरप्राईजेस (०.८८%), विप्रो (०.८५%), इन्फोसिस (०.८४%), चोलामंडलम फायनान्स (०.८१%) समभागात घसरण झाली आहे.


आज शेअर बाजारात अस्थिरता क्वचितच दिसली आहे. भारतीय अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index VIX) १.९९% राहिला. काही क्षेत्रीय निर्देशांकात ही वाढ अधिक राहीली तरी बहुतांश समभागात अधिक राहिली होती. बाजारात सकाळीच 'प्रहार' ने भाकीत केल्याप्रमाणे मंदी कायम राहिली आहे. ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीमुळे आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकालाकडे आ वासून बघत असलेल्या गुंतवणूकदारांना हाती निराशा येण्याची शक्यता अधिक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विकसनशील देशांवर दबाव निर्माण झाला आहे कारण आज युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विकसनशील (ब्रिक्स) देशावर अतिरिक्त १०% टेरिफ लादण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बाजारात 'सन्नाटा' होता. ९ जुलैपर्यंत भारताबाबतही कुठला तोडगा न निघाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली. याचा फटका क्षेत्रीय विशेष समभागात बसला.


मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मागील आठवड्यापर्यंत मोठी घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याने निर्देशांक मर्यादित पातळीवर राहिला. मात्र जसजसे पुन्हा एकदा अस्थिरता वाढल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकाप्रमाणे सोन्याच्या निर्देशांकात चढउतार (Volatility) कायम राहिली होती. त्याची परिणिती म्हणून दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.


मात्र शुक्रवारी जसे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII)अधिक रोख खरेदी केली असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक अधिक प्रमाणात काढून घेतली होती. आज मात्र हेच चित्र उलट झाले असून आज संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारातील गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. युएसचा पेरोल डेटामधील अनपेक्षित दुपट्टीने वाढ झाल्यानंतर अमेरिकन बाजाराला समाधानकारक सपोर्ट लेवल प्राप्त झाली होती.


त्यामुळे सलग दोन आठवडे घसरत असलेला डॉलर पुन्हा स्थिरावला. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची २६ पैशांनी घसरण झाली त्यामुळे एफआयआयने गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकाबाबतही बाजारात सकारात्मकता कायम होती. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सकाळपर्यंत घसरण झाली असली तरी संध्याकाळपर्यंत WTI Futures निर्देशांकात ०.८९% वाढ झाली आहे. तर Brent Future Index निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३९% घसर ण झाली होती.काल कच्च्या तेलाच्या किमती ०.५९% ने घसरून ५६९० वर बंद झाल्या, ओपेक+ उत्पादक देश उत्पादन वाढवत राहतील या अपेक्षेमुळे आणि अमेरिका-इराण अणुप्रसार करारातील प्रगतीच्या नव्या आशांमुळे निर्देशांक कमी झाला. इराणने अणुप्रसार अप्रसार कराराच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि पुढील आठवड्यात चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता यामुळे नकारात्मक दबाव वाढला. मात्र आतातरी क्रूड पातळीत स्थैर्य आहेत.


याशिवाय शेअर बाजार घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे, ट्रम्प प्रशासनाशी करार न केलेल्या देशांवर १ ऑगस्टपासून कर लागू केले जातील असे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सांगितल्यानंतर गुंतवणूकदार सावध झाले आणि भारतीय इक्विटी बेंचमार्क स्थिरावले. सेबीनेही जेन स्ट्रीट प्रकरणात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. परंतु तूर्तास मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये काही अंशी दबावाची स्थिती आहे. फंडामेंटल स्थिर असूनही जागतिक स्थितीतील सातत्याने होणारे बदल यामुळे ब्लू चिप्स कंपन्यांनी अपेक्षित कामगिरी दाखवलेली नाही.


बीएसई आणि एंजल वन स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स प्रत्येकी ६% घसरले, तर सीडीएसएल २% पेक्षा जास्त घसरला. बाजार भांडवलात एकत्रित घट जवळपास १२,००० कोटी रुपये झाली. अखेरीस बाजार बंद होताना बीएसई समभाग ०.१८% वाढला तर सीडीएसएल समभाग ०.९३% वाढला. अदानी समुह जेपी ग्रुप खरेदी करणार असल्याच्या वृत्तानंतर जेपी ग्रुपचा जेपी पॉवर, जेपी असोसिएटसचे समभाग अनुक्रमे २०%, ५% वाढले आहेत. उद्या सोन्याबरोबरच कच्च्या तेलाच्या, डॉलरच्या हालचाली, युएसकडून होत असलेल्या नव्या टेरिफ घडामोडी व वक्तव्ये यावर पुढील बाजाराची दिशा स्पष्ट होऊ शकते. दरम्यान संध्याकाळपर्यंत आशियाई बाजारातदेखील या घडामोडीचे पडसाद बघायला मिळाले आहेत.


आशियाई बाजारातील निकेयी (०.५७%), हेगंसेंग (०.१२%), तैवान वेटेड (०.५३%) बाजारात घसरण होत असून सेट कंपोझिट (०.२७%), जकार्ता कंपोझिट (०.५२%), शांघाय कंपोझिट (०.०२%), कोसपी (०.१७%), स्टेट टाईम्स (०.४५%) समभागात वाढ झाली आहे. सुरुवातीच्या कलात अमेरिकी बाजारातील डाऊ जोन्स (०.०४%) मध्ये घसरण झाली असून एस अँड पी ५०० (०.८४%), नासडाक (NASDAQ १.०२%) वाढ झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले आहेत, '९ जुलै शकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे,आणि आपले टेरिफ संबधित काय सहमती होते आहे याकडे लागले आहे. वाटा घाटीसाठी उच्चपदस्थ तिकडे बसून आहेत. भारताला जो फायदा यातुन मिळणार आहे त्यातून भारत डिफेन्सच्या वस्तू अमेरिकेतून खरेदी करेल, तसेच भारताची ईकाॅनाॅमी एग्रीकल्चरवर अबलंबुन आहे वगैरे गोष्टींची चर्चा व वाटाघाटीत काय साध्य होत आहे हे पहाणे महत्त्वपूर्ण आहे.अमेरिकन इकाॅनाॅमीची पूर्ण वाट लागली आहे.


विकसनशील देशाचा टॅग व सर्व शक्तिमान देश हे बिरूद टिकवणं अमेरीकेला खूप जड जात आहे. आज दिवसाला रू २५००० कोटी फक्त व्याजापोटी जागतिक बॅकेला व आयएफएमला भरावे लागत आहेत. कर्ज आवश्यकतेपेक्षा जास्त झाले आहे. इन्कम खूपच कमी झाले आहे. काहीही करून अंडर डेव्हलप कंट्रीना टेरिफमध्ये अडकवून त्रास होणार आहे. १९८० च्या दरम्यान अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग चीनकडे पाठवताना कोणत्याच गोष्टींचा विचार केलेला नव्हता.आज अमेरिकेला आव्हान म्हणून चीन उभा राहिला आहे. कोणताही देश उत्पादन न करता सर्वश्रेष्ठ राहू शकत नाही हे समजायला अमेरिकेला ४५ वर्ष गेली.  आज अचानक घिसाडघाईने एका दिवसात सर्व इकॉनॉमी सुधारायला निघालेले ट्रम्प अमेरिकेसह सर्व जगाला त्रास देत आहेत. दरवर्षी १० ते १५%दरवाढ टैरिफ मधे केली असती तर हळूहळू सर्व मान्य होत आली असती. आज भारताने इंग्लंडबरोबर झिरो टेरिफचे करार केला आहे याचाच अर्थ आपण अमेरिकेचे अवलंबित्व कमी करणार आहोत.व इतर देशांशी व्यापार वाढवणार आहोत. याचे कारण अमेरिकेवर अनेक देशांचा विश्वास कमीच होता आता पुर्ण अविश्वास होईल.


नाटो देशांनाही ५% वर्गणी सर्व देशांनी करावी असे फर्मान काढले आहे याचाच अर्थ अमेरीका स्वतःची वर्गणी कमी करणार आहे. अनेक देशातील लोकाभिमुख योजनांना मिळणारे अमेरीकन अनुदान यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे. थोडक्यात अमेरिकेतील सरकारला स्वतःचे घर व्यवस्थित करायला सवड व एक विचित्र माणुस मिळाला आहे.टैरिफ चा तमाशा एकदाचा संपला कि प्रत्येक देशाला आपापली भुमिका स्पष्ट होईल. व तेव्हा लक्षात येईल,अमेरिकेची दोस्ती नको आणि दुश्मनी ही ... पुढील काही काळात या टेरिफ वाॅरमुफळे डाॅलरचे महत्त्व खुप कमी होणार. आज मागील ४ वर्षात डाॅलर चा वापर ७०%चे दरम्यान आला आहे तो नक्की खाली येउ शकेल. शस्त्रास्त्र विक्री करणारा देश म्हणून आज असलेली ओळख ती कमी होत आहे म्हणून इतर उत्पादनांची आठवण येत आहे.यासगळ्या घटना पहाता उरलेल्या जगाला काही दिवसच त्रास होईल.भारत या सगळ्यातून नक्कीच थोडाफार बाहेर पडलेला आहे काही काळात पूर्णपणे बाहेर पडलेला असेल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात मंदावलेल्या स्थितीत केली आणि संपूर्ण सत्रात त्याची कामगिरी मंदावली, शेवटी तो स्थिर राहिला. बाजारातील सहभागींनी अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आसपासच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवल्याने अंतर्गत भावना सावध राहिली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा सहभाग कमी झाला. निफ्टी ५० निर्देशांक घट्ट एकत्रीकरण बँडमध्ये व्यवहार करत होता, केवळ ८० अंकांच्या मर्यादित श्रेणीत दोलायमान होता आणि २५,४६१.३० वर किरकोळ बदल झाला. स्पष्ट दिशात्मक ट्रिगर्सच्या अभावामुळे व्यापाऱ्यांमध्ये अनिर्णय दिसून आला.


व्यापक बाजार आघाडीवर,कामगिरी कमी असल्याचे स्पष्ट झाले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.२७% ने घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.४४% ने घसरला, जो व्यापक क्षेत्रात थोडासा जोखीम-बंद भावना दर्शवितो. क्षेत्रीयदृष्ट्या, काम गिरीत स्पष्ट फरक होता, एफएमसीजी निर्देशांकाने समकक्षांपेक्षा चांगली कामगिरी केली, १.६८% वाढ झाली, जागतिक अनिश्चिततेमध्ये बचावात्मक खरेदी आणि मजबूत मागणी लवचिकतेमुळे. तेल आणि वायू निर्देशांकात ०.४% ची माफक वाढ नोंदवण्यात आली, ज्याला अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम काउंटरमधील निवडक खरेदीमुळे मदत झाली. दुसरीकडे, मीडिया निर्देशांकात विक्रीचा दबाव दिसून आला, जो १% ने कमी होऊन बंद झाला, जो कदाचित प्रमुख घटकांकडून कमकुवत तिमाही मार्गदर्शनामुळे प्रभावित झाला असेल. माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि धातू निर्देशांक दोन्ही ०.७% ने मागे पडले.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने एका डोजी कॅन्डलची (Dozy Candle) निर्मिती केली ज्यामध्ये स्टॉक विशिष्ट कृती दरम्यान दोन्ही बाजूंच्या सिग्नलिंग एकत्रीकरणात लहान रिअल बॉडी आणि लांब सावल्या होत्या. पुढे जाऊन, गेल्या दोन सत्रांच्या उच्चांक (२५४९०) वरील फॉलो-थ्रू स्ट्रेंथ २५,६१० पातळींकडे वर उघडेल. तर २५,३३० च्या खाली कमकुवतपणा २५,२०० पातळींकडे खाली उघडेल.


एकूणच,आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक २५,२००-२५,७०० च्या श्रेणीत सकारात्मक पूर्वाग्रहासह एकत्रीकरण वाढवेल. मुख्य स्थितीत्मक आधार २५,२००-२५,००० पातळींवर आहे कारण २० दिवसांच्या EMA (Exponenential Moving Average EMA) चा संगम आणि अलिकडच्या एकत्रीकरण (Consolidation) क्षेत्राची वरची सीमा (२५,२००-२४,५००) आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक समर्थन क्षेत्राच्या वर राहील. म्हणून, घसरणीचा वापर खरेदीची संधी म्हणून केला पाहिजे.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बँक निफ्टीने स्टॉक विशिष्ट हालचालींदरम्यान एकत्रीकरणाच्या विस्ताराचे संकेत देणारी डोजी कॅन्डल तयार केली. येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५६, ०००-५७,५०० च्या श्रेणीत एकत्रीकरण वाढवेल अशी आमची अपेक्षा आहे. येत्या आठवड्यात फक्त ५७,५०० च्या वरची हालचाल ५८,२००-५८,५०० च्या पातळीकडे आणखी वर उघडेल. प्रमुख आधार (Main Support) ५६,०००-५५,५०० क्षेत्रावर आहे, जो प्रमुख तांत्रिक निर्देशकांचा संगम दर्शवितो — ज्यामध्ये ५०-दिवसांचा EMA आणि अलीकडील तेजीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट (५५१४९-५७६१४) समाविष्ट आहे. पीएसयु (PSU) बँकिंग स्टॉक त्यांच्या कामगिरीचा विस्तार करतील अशी अपेक्षा आहे. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि कोणत्याही घसरणीकडे खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'अमेरिकेसोबतचा अंतिम करार पुढे ढकलला जाण्याची अपेक्षा असल्याने, नवीन व्यापार तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना सावध झाल्या असल्याने, बाजार बाजूलाच व्यवहार करत होता, ज्यामुळे अल्पावधीत अनिश्चितता निर्माण झाली आहे.  देशांतर्गत, घसरणारे व्याजदर आणि कर कपातीमुळे, गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्नाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहिले आहे जेणेकरून संचय धोरण स्वीकारण्यास मदत होईल.  मार्जिन स्थिरीकरणामुळे शहरी मागणीत सलग वाढ होण्याची अपेक्षा असल्याने, एफएमसीजी शेअर्सनी आज लक्ष वेधले.'


बाजारातील निफ्टी हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की, 'बाजारपेठेतील सहभागी अमेरिका भारत करारावरील कोणत्याही अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने निर्देशांक अत्यंत स्थिर राहिला. ट्रम्पच्या टॅरिफवर स्पष्ट निकाल न लागल्याने दैनंदिन चार्टवर एक अनिर्णीत मेणबत्ती (Unresulted Candle) तयार झाली आहे, जी सतत मंदावलेली भावना दर्शवते. खालच्या टोकाला,समर्थन २५,४०० वर ठेवले आ हे. या पातळीपेक्षा कमी झाल्यास अल्पकालीन विक्रीचा दबाव येऊ शकतो. २५,४०० च्या खाली, अतिरिक्त समर्थन २५,२५० आणि २५,१०० वर दिसून येते. वरच्या टोकाला, प्रतिकार २५,५०० वर ठेवला आहे. या पातळीपेक्षा जास्त निर्णायक हालचाल निफ्टीला २५,८०० च्या दिशेने ढकलू शकते.'


आजच्या बाजारातील सोन्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की, 'सावध भावनेमुळे कॉमेक्स सोन्याचे भाव $३,३१० पर्यंत घसरल्याने सोन्याचे भाव सुमारे ९६,६५० च्या जवळ कमकुवत राहिले, सुमारे ३५० ने घसरले.  या आठवड्यात, यूएस ट्रेड टॅरिफ एक्सटेंशन टाइमलाइनची मुदत संपल्याने जागतिक व्यापार करारांभोवती अनिश्चितता फोकसमध्ये आहे. सहभागींना संभाव्य मुदतवाढीची अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्यावर थोडासा दबाव आहे. याव्यतिरिक्त, आगामी यूएस फेड बैठकीचे मिनिटे मध्यवर्ती बँकेच्या शेवटच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल सखोल अंतर्दृष्टी देऊ शकतात. जवळच्या काळात सोन्याचे भाव ९५,५००- ९७,५०० रूपयांच्या श्रेणी त व्यापार होण्याची शक्यता आहे.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' अमेरिकेतील व्यापार करारांवरील अनिश्चिततेमुळे डॉलरची ताकद परतल्याने रुपया ०.४७ रुपयांनी किंवा ०.५६% ने कमकुवत होऊन ८५.८७ वर बंद झाला. ९० दिवसांच्या टॅरिफ विस्तार कालावधी संपण्याच्या जवळ आला आहे. अद्याप कोणतेही औपचारिक करार झालेले नाहीत, त्यामुळे बाजारातील भावना सावध झाल्या आहेत. सर्वांचे लक्ष आता आगामी फेड बैठकीच्या मिनिटांवर आहे, जे डॉलरची दिशा आणखी पुढे नेऊ शकते. नजीकच्या काळात रुपया ८५.२५ ते ८६.२५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'


त्यामुळे आजच्या बाजारातील बारकाईने लक्ष दिल्यास अमेरिकन बाजारातील हालचाली ठेवणे महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याशिवाय क्षेत्रीय विशेष समभागातील हालचाली बाजारात परिणाम करू शकतात ते केवळ उद्याच्या मिडकॅप, सेन्सेक्स बँक व बँक निफ्टी यांच्या निर्देशांकातील हालचाली बाजारातील पातळीसाठी निर्णायक ठरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >