
प्रतिनिधी: भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरात व निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढउतार झाली. त्याचाच परिणाम सोन्याच्या गुंतवणूकीत दिसला होता. आजही पुन्हा एकदा सोन्याने 'युटर्न' घेत सोने आज मुबलक प्रमाणात स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरणीनंतर डॉलरच्या दरातही सततच्या घसरणीचा परिणाम सोन्यात दिसला. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ५४ रूपयाने घसरण होत दरपातळी ९८२९ रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ५० रूपयांनी घसरत ९०१० रूपये पातळीवर पोहोचली आहे तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ४१ रूपयांनी घसरत ७३७२ रूपयांवर पोहोचली.
माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ५४० रूपयांनी घसरत ९८२९० रूपयांवर, २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ५०० रूपयांनी घसरत ९०१०० रूपयांवर तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४१० रूपयांनी घसरत ७३७२० रुपयांवर गेली. गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये १.०२% अंकांची घसरण झाली. जागतिक पातळीवर युएस गोल्ड स्पॉट किंमतीत १% घसरण झाली. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये ०.४८% घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याभरातही सोन्यात चढउतार झाले होते. भूराजकीय स्थितीमुळे मागील आठवड्यात सहा महिन्यांत सोन्यात सर्वाधिक घसरण झाली होती. सोन्याचा दर मुंबईसह प्रमुख शहरातील सराफा बाजारात सरासरी २४ कॅरेट प्रति ग्रॅम ९८२९, २२ कॅरेट प्रति ग्रॅम ९०१०, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४३५ रूपयांवर कायम आहे.
अजूनही ट्रेड टेरिफची कुठलीही विशेष घडामोड न घडल्याने अनिश्चितता कायम राहिली. परिणामी परदेशी संस्थात्मक (FII) गुंतवणूकदारांसह भारतीय घरगुती गुंतवणूकदारांमधील अनिश्चितता कायम आहे. भूराजकीय पातळीवर अमेरिक ची टेरिफ (Tariff) सक्ती पाहता अनेक देशांत नाराजी पसरली आहे. दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न केल्याने ट्रम्प यांनी फेड अध्यक्ष जेरोम जेरोमी पॉवेल यांच्यावर नाराजी अनेकदा व्यक्त केली होती. आता पेरोल विना शेती (Non Farm Employment Payroll Data) अपेक्षेपेक्षा अर्ध्या पटीने वाढल्यानंतर बाजारात सौम्य संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आधीपेक्षा अमेरिकन बाजारात सुधारणा होत असली तर परदेशी धोरणावर अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर जगभरातील व्यापार अस्थिरता वाढण्याची शक्यता असतानाही गुंतवणूकदारही युएस बाजारातून समभागांची विक्री मोठ्या स्तरावर करत आहेत. खरं तर याचा फायदा होण्यापूर्वीच किंवा गुंतवण्यापूर्वीच सेबी अनियमितेवरील करत असलेल्या कारवाईमुळे घरगुती गुंतवणूकदारांचा प्रतिसादही संमिश्र राहिला. अशा अस्थिरतेच्या परिस्थितीत सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोन्याचा दर लक्षणीयरित्या खाली आला.
मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर तसेच युक्रेन युद्धात शांती निर्माण झाल्यानेही सोन्याची सप्लाय चेन सुरळीत सुरू आहे. अशातच सोन्याच्या निर्देशांकात घसरण होत असताना बाजारातील लक्ष कदाचित पुढील फेडच्या अमेरिकन डेटामध्ये काय बोलले जाते याकडे गुंतवणूकाचे लक्ष असणार आहे. वाढत्या भू-राजकीय तणाव आणि व्यापार अनिश्चिततेमुळे २०२५ च्या सुरुवातीपासून भारतात सोन्याचा दर २५% पेक्षा जास्त वाढला आहे. परंतु दबावानंतर गेल्या आठवड्यातील सोन्याचा दर हा सहा आठवड्यातील सर्वांत कमी दर राहिला आहे.
चांदीचा दर दुसऱ्यांदा जैसे थे!
आज चांदीच्या दरात शनिवारप्रमाणे मागणी मर्यादित कायम आहे. परिणामी चांदी प्रति ग्रॅम ११० रूपये व प्रति किलो किंमत ११०००० रूपयांवर कायम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात १.२५% घसरण झाली असून भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीचा निर्देशांक ०.५९% अंकाने कोसळला.तर एकूण एमसीएक्स चांदीच्या दराची किंमत खालावत १०७७९३ रूपयांवर पोहोचली.