
वॉशिंग्टन: सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ जुलैला विविध देशांवर लागणारा टॅरिफ लेटर जारी केले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर ट्रम्प यांनी दोन पानांचे पत्र जारी केले आहे. यात त्यांनी सांगितले आहे की जपान आणि दक्षिण कोरियावर अमेरिका २५ टक्के टॅरिफ लावणार आहे. नवे टॅरिफ दर १ ऑगस्टपासून २०२५ पासून लागू होतील.
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी रविवारी म्हटले होते की टॅरिफबाबतचे जे लेटर जारी केले जाईल ते नॉन नेगोशिएबल असेल आणि ते स्वीकारू शकतात अथवा नाहीही. ट्रम्प म्हणाले होते की त्यांनी १२ देशांना पत्र लिहिले असून त्यात त्या देशांवर किती टक्के टॅरिफ लावला आहे हे सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती याआधी ही पत्रे ४ जुलैला जारी करणार होते. मात्र ते टाळण्यात आले होते.
राष्ट्रपती ट्रम्प यांच्याकडून जपानचे पंतप्रधान इशिबा शिगेरू आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यांग यांना पाठवलेल्या पत्राचे स्क्रीन शॉटही शेअर करण्यात आले आहेत. यात त्यांनी टॅरिफ दरांचा नवा सेट लागू करण्याच्या आपल्या योजनेबाबत सांगितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपतींनी बिक्स समूहातील अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिबा देणाऱ्या देशांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. २०२४मध्ये याचा विस्तार होऊन इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश करण्यात आला. २०२५मध्ये इंडोनेशियाचाही यात समावेश झाला आहे.