
लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्यांनी सभागृहात अहवाल मागवतो असं सांगितलं. पण या पद्धतीने मंत्र्याने आयत्यावेळी अहवाल मागवून सभागृहाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना खडे बोल सुनावले.
कामकाजाची कार्यक्रमपत्रिका आधीच जाहीर झाली होती. या कार्यक्रमपत्रिकेनुसार दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती. यामुळे उत्तर देण्यासाठी मंत्र्याने तयारी करुन येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात लक्षवेधी बदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं म्हटलं. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले. अधिवेशनावेळी अहवाल कसा काय मागवता ? असा खडा सवाल भर सभागृहात नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला.