ठाकरेंसोबत युती केल्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

नागपूर : उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज (सोमवार, ७ जुलै) रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.


काँग्रेसची स्थिती फार वाईट


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नेहमीच अपमानित केले आहे. त्यामुळे अजून किती अपमानित व्हायचे ते काँग्रेस पक्षाने ठरवायचे आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतू, उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धवजींनी जिद्द करून काँग्रेसच्या जागा घेतल्या आणि काँग्रेसला कमी केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगावर आला. ठाकरे सरकारची अँटी इनकंबन्सी काँग्रेसवर आली. त्यावेळी काँग्रेसचे नेते हतबल होते. त्यामुळे आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

Kriti Sanon Controversy : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीने घेतलं राजकीय वळण; राहुल गांधींच्या समर्थनानंतर कंगना रणौतचा टोला

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे.

Basuri Swaraj : ‘पितृसत्ता मोडून काढा’ म्हणणाऱ्या राहुल गांधींवर बासुरी स्वराज संतापल्या

नवी दिल्ली : अभिनेत्री कृती सॅनॉनच्या रक्षाबंधन विशेष दागिन्यांच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता थेट

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेल्या