कुणाल कामरा विरुद्ध विशेषाधिकार भंग प्रस्ताव मंजूर, नोटिस पाठवायची की नाही याबद्दल समिती घेणार निर्णय

  57

समितीच्या तपासानंतर कुणाल कामरा यांना नोटीस पाठवायची की नाही हे ठरवले जाईल 


मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध "विशेषाधिकार भंग" प्रस्ताव मंजूर केला आहे आणि तो परिषदेच्या विशेषाधिकार समितीने चौकशीसाठी पाठवला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या वर्षी मार्चमध्ये विधान परिषदेत हा प्रस्ताव दाखल केला होता, ज्यामध्ये कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचा आरोप केला होता. नंतर, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि तो विशेषाधिकार समितीकडे पाठवला. आता समिती कामरा यांना नोटीस पाठवायची की नाही यावर सुनावणी करेल आणि निर्णय घेईल.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप या प्रस्तावात करण्यात आला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. आता विधान परिषदेची हक्कभंग समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. समितीच्या तपासानंतर कुणाल कामरा यांना नोटीस पाठवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल

कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक एक गाणं तयार करत, त्याचा व्हिडिओ शूट केला होता. त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे उबाठा गटाकडूनदेखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सुषमा अंधारेंनी देखील व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 
Comments
Add Comment

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे,

प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांवर कडक कारवाई: मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे

धक्कादायक! २५८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द!

मुंबई : खाजगी आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहारांवर निर्णायक कारवाई करत, महाराष्ट्र सरकारने बॉम्बे नर्सिंग होम्स

मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र वाटप! विभाग उपायुक्तावर निलंबनाची कारवाई

बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आदिवासी विकास भवनात उपायुक्तांवर थेट निलंबनाची कारवाई मुंबई: पावसाळी अधिवेशनात

Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती': मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, १० हजार कोटींची बचत होणार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एक