
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली होती निना यांना कोल्हापुरी चप्पल भेट
मुंबई: प्राडा विरुद्ध कोल्हापुरी (Prada vs Kolhapuri) वादाच्या पार्श्वभूमीवर आता 'पंचायत'ची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी कोल्हापुरी चप्पल विषयी एक फोटो पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी कोल्हापूरी चपलेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री नीना यांना दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी ही कोल्हापुरी चप्पल भेट दिली होती, जी हस्तनिर्मित आहे.
View this post on Instagram
नीना गुप्ता यांनी प्राडा विरुद्ध कोल्हापुरी वादाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट केलीय.त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे क्लासिक कोल्हापुरी चप्पलेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याआधी करीना कपूर खानने देखील लक्झरी ब्रँड प्राडावर टीका करत भारतीय फुटवेअरचे समर्थन केले होते. नीना गुप्ता यांनी व्हिडिओमध्ये त्यांची कोल्हापुरी चप्पल दाखवली आहे. रिपोर्टनुसार नीना यांनी म्हटलं की, ''हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिली होती. एक कलाकृती, एक आठवण..खरोखरच अद्वितीय.''
तिच्या या व्हिडिओवर नेटिझन्स म्हणाले- ''कोल्हापुरीने स्वतःची जागा निर्माण केली आहे. भारतीय ब्रँडला पाठिंबा आणि प्रमोट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही नेहमीच प्रेरणा आहात.'' तर दुसऱ्या नेटीझन्सने पुढे म्हटले की, ''वाह! इतके वर्ष जशीच्या तशी आहे, हे खूपच अद्भुत आहे.''