Saturday, July 5, 2025

माझी काय चूक होती?

माझी काय चूक होती?

क्राइम : अ‍ॅड. रिया करंजकर


पूर्ण जगाला हादरून सोडणारा कोराेनासारखा संसर्गजन्य रोग आल्यानंतर सर्व जग हे विशिष्ट काळापर्यंत थांबलं होते. यात अनेकांचे नातेवाईक गेले तो काळ म्हणजेच दुःखाचा काळ होता. पण याच काळामध्ये अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकायलाही मिळाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातात मावणारा मोबाइल. शाळेत मोबाइल वापरण्यासाठी बंदी होती, पण या लॉकडाऊन काळामध्ये मोबाइलमध्येच अभ्यासाची शिकवणी सुरू होती. त्यामुळे सर्रास मुले मोबाइल हाताळणे शिकले. आई-वडिलांपेक्षा मुलांच्या हातामध्ये मोबाइल जास्त दिसू लागला. पालकांनी काय करतो विचारलं की, अभ्यास चालू आहे हेच उत्तर येऊ लागलं, पण या अभ्यासाबरोबर मुलं नको त्या गोष्टींच्या सवयींनी व्यसनाधीन झाले.


मोबाइल, इंटरनेटमध्ये अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. दहा-बारा वर्षांखालील मुलांच्याही हातात मोबाइल येऊ लागले. एवढेच नाही तर दीड-दोन वर्षांचं मूल जेवताना हातात मोबाइल शिवाय जेवत नाही असे पालक सांगू लागले.


युट्यूब बघताना मुलांच्या समोर अचानक अश्लिल व्हीडिओ येऊ लागली. त्यामुळे या गोष्टी काय आहेत याची उत्सुकता या बाल मनावर होऊ लागली. नको त्या वयात ही मुलं जाणती होऊ लागली. गजबजलेल्या वस्तींमध्ये नको ते अतिप्रसंगही होऊ लागले. ज्या वस्तींमध्ये आजपर्यंत अघटीत घटना घडल्या नव्हत्या तिथे अचानक अशा घटना घडू लागल्या.


झोपडपट्टी म्हटल्यावर त्या ठिकाणी अधिक जाती प्रांताची लोक एकत्र राहतात. लॉकडाऊनच्या नंतर अनेक परप्रांतीय मुंबईत लोंढेच्या लोंढे येऊन मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहू लागले. झोपड्या भाड्याने देताना त्यांचा पूर्व इतिहास न बघता भाडं मिळतंय ना या उद्दिष्टाने मालक आपली रूम भाड्याने देऊ लागला. जिथे मराठी माणूस दिसत होता तिथे आता परप्रांतीय लोकांचा भरणा जास्त वाढू लागला होता. या झोपड्यांमध्ये बिनधास्त शेजाऱ्यांकडे आपली मुलं ठेवून कामाला जाणारे आई-वडील त्यावेळी होते, पण आता ही भीती वाढू लागली होती. कारण परप्रांतीय त्या वस्तींमध्ये घुसले होते.


मिनू ही नऊ वर्षांची. ती आपल्या मैत्रिणींसोबत घराच्या समोर असलेल्या छोट्याशा मैदानावर खेळत होती. त्या मैदानाच्या समोरच एका ठिकाणी चार-पाच मुलं मोबाइलवर काहीतरी करत होते. मिनू नेहमीप्रमाणे तिथे आपल्या मैत्रिणींसोबतच खेळत होती. एवढ्यात त्या घोळक्यातल्या एका मुलाने मिनूला बोलवलं आणि सांगितलं मिनू माझा मोबाइल मी घरी विसरलो आहे तू तो घेऊन येशील का? मिनू ही त्या बंड्याला ओळखत होती. कारण तो त्यांच्या समोरच्याच घरामध्ये भाड्याने राहत होता.


ओळखीचा दादा होता. तिला त्याचं घर माहीत असल्यामुळे ती लगेचच हो म्हणाली आणि खेळता खेळता बंड्या दादाने सांगितले म्हणून मोबाइल आणायला गेली. ती घरी पोहोचत नाही तोपर्यंत हा बंड्या तिच्या मागे गेला. एवढा वेळ झाला तरी आपली मुलगी अजून घरी का नाही आली म्हणून मिनूची आई तिच्या मैत्रिणींकडे विचारायला लागली. अरे तुम्ही सर्वजण खेळताय मिनू कुठे आहे? मुलांनी सांगितलं ती बंड्या दादाच्या घरी मोबाइल आणायला गेली ती अजून आलेली नाही. म्हणून मीनूची आई तिथेच उभी राहून मिनूला हाका मारायला लागली, पण त्या हाकेला उत्तर काही येईना. मिनूच्या आईला शंका आल्यामुळे तिने मुलांना विचारलं मिनूला जाऊन किती वेळ झाला. मुले म्हणाली बराच वेळ झाला आहे. म्हणून मीनूची आई धावत घराकडे गेली, तर घराला बाहेर कडी लावलेली होती. तिने उघडून आत बघितले असता तिची मुलगी निपचित पडली होती. मिनूच्या आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली.


आजूबाजूच्या नागरिकांना नेमकं काय झालं ते समजत नव्हते. मिनूला लागलीच डॉक्टरांकडे घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे सांगण्यात आले. लहान मुलांच्या सांगण्यावरून ती बंड्याच्या घरी मोबाइल आणायला गेलेली होती या कारणावरून पोलिसांनी त्या बंड्याला आधी ताब्यात घेतला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.


मिनूची अशी अवस्था झाली होती की तिला दोन पावलंही चालता येत नव्हते. बंड्याने पोलिसांना या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली. भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी असा प्रसंग घडला होता. त्यामुळे आज कुठे काय होईल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. अल्पवयीन मुलं मोबाइलमुळे नको त्या गोष्टींच्या आहारी गेले आहेत. अल्पवयीन मुलांना पालकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी वाईट आहेत हे सांगितले आहे. तसेच आजच्या काळात
मुलींना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे गरजेेचे आहे.


(सत्यघटनेवर आधारित)र्ण जगाला हादरून सोडणारा कोराेनासारखा संसर्गजन्य रोग आल्यानंतर सर्व जग हे विशिष्ट काळापर्यंत थांबलं होते. यात अनेकांचे नातेवाईक गेले तो काळ म्हणजेच दुःखाचा काळ होता. पण याच काळामध्ये अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकायलाही मिळाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातात मावणारा मोबाइल. शाळेत मोबाइल वापरण्यासाठी बंदी होती, पण या लॉकडाऊन काळामध्ये मोबाइलमध्येच अभ्यासाची शिकवणी सुरू होती. त्यामुळे सर्रास मुले मोबाइल हाताळणे शिकले. आई-वडिलांपेक्षा मुलांच्या हातामध्ये मोबाइल जास्त दिसू लागला.


पालकांनी काय करतो विचारलं की, अभ्यास चालू आहे हेच उत्तर येऊ लागलं, पण या अभ्यासाबरोबर मुलं नको त्या गोष्टींच्या सवयींनी व्यसनाधीन झाले. मोबाइल, इंटरनेटमध्ये अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. दहा-बारा वर्षांखालील मुलांच्याही हातात मोबाइल येऊ लागले. एवढेच नाही तर दीड-दोन वर्षांचं मूल जेवताना हातात मोबाइल शिवाय जेवत नाही असे पालक सांगू लागले.


युट्यूब बघताना मुलांच्या समोर अचानक अश्लिल व्हीडिओ येऊ लागली. त्यामुळे या गोष्टी काय आहेत याची उत्सुकता या बाल मनावर होऊ लागली. नको त्या वयात ही मुलं जाणती होऊ लागली. गजबजलेल्या वस्तींमध्ये नको ते अतिप्रसंगही होऊ लागले. ज्या वस्तींमध्ये आजपर्यंत अघटीत घटना घडल्या नव्हत्या तिथे अचानक अशा घटना घडू लागल्या.


झोपडपट्टी म्हटल्यावर त्या ठिकाणी अधिक जाती प्रांताची लोक एकत्र राहतात. लॉकडाऊनच्या नंतर अनेक परप्रांतीय मुंबईत लोंढेच्या लोंढे येऊन मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहू लागले. झोपड्या भाड्याने देताना त्यांचा पूर्व इतिहास न बघता भाडं मिळतंय ना या उद्दिष्टाने मालक आपली रूम भाड्याने देऊ लागला. जिथे मराठी माणूस दिसत होता तिथे आता परप्रांतीय लोकांचा भरणा जास्त वाढू लागला होता. या झोपड्यांमध्ये बिनधास्त शेजाऱ्यांकडे आपली मुलं ठेवून कामाला जाणारे आई-वडील त्यावेळी होते, पण आता ही भीती वाढू लागली होती. कारण परप्रांतीय त्या वस्तींमध्ये घुसले होते.


मिनू ही नऊ वर्षांची. ती आपल्या मैत्रिणींसोबत घराच्या समोर असलेल्या छोट्याशा मैदानावर खेळत होती. त्या मैदानाच्या समोरच एका ठिकाणी चार-पाच मुलं मोबाइलवर काहीतरी करत होते. मिनू नेहमीप्रमाणे तिथे आपल्या मैत्रिणींसोबतच खेळत होती. एवढ्यात त्या घोळक्यातल्या एका मुलाने मिनूला बोलवलं आणि सांगितलं मिनू माझा मोबाइल मी घरी विसरलो आहे तू तो घेऊन येशील का? मिनू ही त्या बंड्याला ओळखत होती.


कारण तो त्यांच्या समोरच्याच घरामध्ये भाड्याने राहत होता. ओळखीचा दादा होता. तिला त्याचं घर माहीत असल्यामुळे ती लगेचच हो म्हणाली आणि खेळता खेळता बंड्या दादाने सांगितले म्हणून मोबाइल आणायला गेली. ती घरी पोहोचत नाही तोपर्यंत हा बंड्या तिच्या मागे गेला.


एवढा वेळ झाला तरी आपली मुलगी अजून घरी का नाही आली म्हणून मिनूची आई तिच्या मैत्रिणींकडे विचारायला लागली. अरे तुम्ही सर्वजण खेळताय मिनू कुठे आहे? मुलांनी सांगितलं ती बंड्या दादाच्या घरी मोबाइल आणायला गेली ती अजून आलेली नाही. म्हणून मीनूची आई तिथेच उभी राहून मिनूला हाका मारायला लागली, पण त्या हाकेला उत्तर काही येईना. मिनूच्या आईला शंका आल्यामुळे तिने मुलांना विचारलं मिनूला जाऊन किती वेळ झाला.


मुले म्हणाली बराच वेळ झाला आहे. म्हणून मीनूची आई धावत घराकडे गेली, तर घराला बाहेर कडी लावलेली होती. तिने उघडून आत बघितले असता तिची मुलगी निपचित पडली होती. मिनूच्या आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या नागरिकांना नेमकं काय झालं ते समजत नव्हते. मिनूला लागलीच डॉक्टरांकडे घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे सांगण्यात आले.


लहान मुलांच्या सांगण्यावरून ती बंड्याच्या घरी मोबाइल आणायला गेलेली होती या कारणावरून पोलिसांनी त्या बंड्याला आधी ताब्यात घेतला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.


मिनूची अशी अवस्था झाली होती की तिला दोन पावलंही चालता येत नव्हते. बंड्याने पोलिसांना या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली. भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी असा प्रसंग घडला होता. त्यामुळे आज कुठे काय होईल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. अल्पवयीन मुलं मोबाइलमुळे नको त्या गोष्टींच्या आहारी गेले आहेत. अल्पवयीन मुलांना पालकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी वाईट आहेत हे सांगितले आहे. तसेच आजच्या काळात मुलींना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे गरजेेचे आहे.

Comments
Add Comment