 |
आत्मविश्वास भरपूर असणार आहे
मेष : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सुख संविधानामध्ये वाढ होणार आहे. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे विक्री वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे. जुनी राहिलेली कामं पूर्ण होणार. कुटुंब परिवारातील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने चांगला कालावधी, आर्थिक उन्नती होईल. व्यवसायातील नवीन धोरणात व बदल आपल्या व्यवसायासाठी अनुकूल ठरतील. कलाकार खेळाडूंना आनंदित करणाऱ्या वार्ता मिळू शकतात. उत्साहात भर पडेल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. विद्यार्थ्यांना कालावधी अनुकूल असला तरी प्रयत्न कमी पडू देऊ नका.
|
 |
आर्थिक लाभ मिळतील
वृषभ : या सप्ताहात ग्रह योग आपणास अनुकूल असणार आहे. तुम्ही विचार केलेले आणि नियोजित केलेली कामे, त्याचप्रमाणे होणार आहेत. पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरताना दिसेल. जुन्या गुंतवणुकीपासून आर्थिक लाभ मिळतील. भौतिक सुखाबरोबरच ऐश्वर्य आणि संपन्नता वाढवणारा काळ आहे. आनंदात व मौजमजेत वेळ घालवणार आहात. बराच काळ घरातील वादळी वातावरण संपणार आहे. आपल्या मुलांकडून काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपली मानप्रतिष्ठा, सामाजिक स्तर उंचावणार. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगले लाभ मिळणार आहेत. एखादी स्थिर संपत्ती आपण खरेदी करू शकता. काहींना वास्तूयोग त्याचप्रमाणे नवीन वाहन खरेदी करू शकाल. |
 |
कालावधी आपल्या प्रगतीचा असणार आहे
मिथुन : हा कालावधी आपल्या प्रगतीचा असणार आहे. आपली एनर्जी लेव्हल उच्चप्रतीची असणार आहे. आपल्या पतप्रतिष्ठेमध्ये वृद्धी होऊन मानसन्मान मिळेल. काही नवीन संधी चालून येतील. महत्त्वकांक्षा पूर्ण होताना अनुभवता येईल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. जनसंपर्कात वृद्धी होईल. आपणास एखादी चांगली बातमी समजू शकते किंवा खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आपणास मिळू शकतात. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाटणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी आपली काही राहिलेली कामे पूर्ण होतील. निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
|
 |
आनंद आणि आशा निर्माण होणार
कर्क : आपल्या राशीतील शुभ ग्रहांच्या गोचर प्रमाणामुळे, ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये नीरसता आली होती किंवा कंटाळवाणी जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही. पूर्वीचे काही येणे असेल, ती येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना संततीसाठी बरेच दिवस वाट बघायला लागली आहे, त्यांच्यासाठी संतती प्राप्तीचे शुभयोग आहेत. आपल्यासाठी भाग्याची दारे उघडणार आहेत. नोकरीमधील परिस्थिती समाधानकारक राहील. |
 |
व्यावसायिक धनवर्षाव
सिंह :सदरचा कालावधी एकूणच शुभंकर फलप्राप्ती देणारा ठरेल. नोकरी व्यवसायातील महत्त्वाचा कालावधी आहे. व्यावसायिक उधारी वसूल होईल. स्पर्धकांना नामोहरम करण्यात यश मिळेल. व्यावसायिक यशाची चढती कमान पूर्वी केलेले नियोजन सफल होताना अनुभवता येईल. व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी झालेली दिसेल. भागीदारी व्यवसायात भागीदाराकडून विशेष लाभ होतील. भागीदाराच्या मतास प्राधान्य देणे हितकारक ठरेल. नोकरीमध्ये अनुकूलता, चालू नोकरीत वेतन वृद्धी तसेच पदोन्नती संभवते.
|
 |
गुप्त चिंता संपुष्टात येतील
कन्या : सप्ताहाच्या पूर्वार्धात जरा सावधानता बाळगणे आवश्यक आहे. स्वतःचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. जुन्या व्याधी नव्याने उभारण्याची शक्यता. विशेषत: महिला वर्गाने सावध राहावे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून समाधानकारक कालावधी. आतापर्यंतच्या काही विशिष्ट गुप्त चिंता संपुष्टात आल्यामुळे समाधानी राहाल. काही फायद्याचे सौदे हाती येतील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. काही कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.
|
 |
महत्त्वाचे करार-मदार
तूळ : स्थायी संपत्ती, जमीन जुमला वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे रेंगाळलेले प्रश्न संपुष्टात येऊन सर्व मान्य तोडगा निघू शकतो. त्यातूनच धनलाभ होऊ शकेल. आर्थिक स्तर उंचावेल. जमिनीत तसेच स्थायी मालमत्तेत देखील गुंतवणूक करता येईल. नवीन वाहन खरेदी करू शकाल. प्रयत्नांना यश मिळून स्वप्न साकार होईल. नोकरीत काही अनपेक्षित प्रसंग मनास प्रसन्नता देतील. अचानक धन लाभाचे योग. व्यवसाय-धंद्यात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात महत्त्वाचे करार मतदार होतील. व्यावसायिक दीर्घ मुदतीचे करार होऊ शकतात. चालू नोकरीत पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग.
|
 |
मतभेद संपुष्टात येतील
वृश्चिक : सध्याचा कालावधी कौटुंबिक सुख समाधान देणारा आहे. वैवाहिक सुख मिळेल. कुटुंबात पती अथवा पत्नीचे भाग्योदय होईल. पती-पत्नीमधील असलेले मतभेद संपुष्टात येतील. संबंध मधुर होऊन कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर बातम्या कानी येतील. मुलांची शैक्षणिक प्रगती अनुभवता येईल. कुटुंबातील विवाह योग्य तरुण-तरुणांचे विवाह निश्चित होतील. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ अपेक्षेनुसार मिळू शकते. चालू नोकरीतील चिंता मिटतील. केलेल्या कार्याचे यथोचित फळ मिळेल.
|
 |
ओळखी, मध्यस्थी फलदरूप होतील
धनु : सध्याच्या कालावधीमधील पूर्वार्ध जरी फारसा अनुकूल नसला तरी निराश होण्याचे कारण नाही. थोड्याच अवधीमध्ये परिस्थिती बदलून जाईल. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंबातही काही वेळेस विरोध सहन करावा लागू शकतो. कायदेविषयक बाबींचे उल्लंघन नको. तसेच वादविवाद टाळून कलह सदृश्य परिस्थिती पासून अलिप्त राहावे. लहान-मोठ्या गोष्टींकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करणे फायद्याचे ठरेल. हळूहळू परिस्थिती बदलत राहील. आर्थिक ओघ सुरू राहील. |
 |
वास्तुविषयक प्रश्न सुटतील
मकर : सुरुवातीला प्रकृतीचे प्रश्न निर्माण होताना दिसले तरी पुढे आरोग्य स्थिर राहील. कोणतेही लहान मोठे कार्य करताना आत्मनिर्णय घेताना कसलाही धोका पत्करू नये. आपल्या क्षमतेतील निर्णय घ्यावेत. मध्यस्थीच्या व्यवहारात जरा जास्तच लक्ष द्यावे. शुभ ग्रहांच्या प्रवाहाने मोठे प्रश्न सोडवताना यश मिळणार आहे. महत्त्वाच्या वास्तुविषयक प्रश्नांना गती मिळवून ते यशस्वी होतील. राहत्या घराविषयी काही समस्या असल्यास त्या सुटतील. तसेच वास्तू योगही आहेत. नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावरती नियंत्रणातील आवश्यक. तसेच वाहनांना जपा. |
 |
नवनवीन संधींचा लाभ
कुंभ : चालू कालावधी विशेषतः तरुण- तरुणींना अनुकूल राहील. नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनाही नोकरी मिळेल. नोकरी विषयक प्रश्न सुटतील. पूर्वी दिलेली नोकरी विषयक मुलाखत आत्ता सफल झालेली दिसून येईल. कोणत्याही वादाच्या प्रसंगाला सामोरे जाताना सावधपणे निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच वादग्रस्त व्यवहार टाळणे आवश्यक आहे. कोणत्याही लहान मोठ्या मोहाला बळी पडू नका. तसेच प्रलोभनांपासून दूर राहा. नोकरीत आपले स्थान बळकट होताना दिसणार आहे. अधिकारांमध्ये वृद्धी होईल; परंतु आपल्या अधिकारांच्या कक्षा ओळखा व त्या कक्षामध्येच आपले कार्य पूर्ण करा. काही चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळणार आहेत. |
 |
निर्णय अचूक ठरतील
मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घेणे प्रमुख प्राप्त ठरेल. काही वेळेस डोळ्यांचे त्रास होऊ शकतात. तसेच काही ग्रहांच्या योगामुळे आपणास हवे तसे सहकार्य न मिळाल्यामुळे आपल्या अपेक्षा नियंत्रणात ठेवाव्या लागतील. स्वतः नियम अटी पाडूनच कार्य करावे लागणार आहे. छोट्या-मोठ्या चिंतांचे निवारण होताना दिसेल. समस्या सुटतील. संततीचे प्रश्न मार्गस्थ होताना दिसतील. कलाकार व खेळाडूंना अनुकूल वातावरण आहे. अपेक्षित कार्य होतील. तसेच उत्पन्नामध्ये वृद्धी होईल. व्यावसायिकांना चांगला कालावधी असला तरी पुढील पावले उचलताना सावधगिरी बाळगावी. आर्थिक उन्नती होईल.
|