विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

  19

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात ! ज्या चित्रपटाची इतके दिवसांपासून चर्चा होती तो ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. महेश मांजरेकर यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत, चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या भव्य चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभावी टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर देखील झळकली आहे.


टीझरमध्ये ऐकू येणारे 'राजं… राजं' हे बोल ज्या ऊर्जेने, ज्या भावनांनी भरलेले आहेत, ते थेट काळजाला भिडतात. सिद्धार्थ बोडकेच्या संवादांमधून केवळ इतिहासाची आठवण होत नाही, तर मनात नवी उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा संचारते. शिवरायांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यागमय नेतृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या टीझरमधील दृश्यं आणि संवाद हे अंगावर शहारे आणणारे आहेत.या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक पुनरावलोकन न होता, आधुनिक काळातील समाजाला भिडणारा विचारप्रवाह पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहाणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे..’’

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट भूतकाळात रमणारा नाही, तर आजच्या समाजाला जागं करणारा ठरणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार आणि तत्वं या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सशक्त माध्यमातून साकारलेला प्रयत्न आहे.
Comments
Add Comment

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचा अंतिम सोहळा

मुंबई : सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले