
आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी
सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपुरच्या आषाढी सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यामुळे सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून लाखो वैष्णवांची मांदियाळीने पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले आहे, भाविकांच्या दाटीमुळे पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या वैष्णवामुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांच्या हस्ते रविवारी पहाटे पार पडली.
आषाढी मात्रा ही सर्वांत मोठी यात्रा असते. त्यामुळे या यात्रेनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मुख्यमंत्री शनिवारी मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाले व सोलापुरातून हेलिकॉप्टरने ते पंढरपूरकडे रवाना झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या मजल दरमजल करत शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे वाखरी येथील शेवटचे उभे रिंगण शुक्रवारी दुपारी संपल्यानंतर पालख्या वाखरी मुक्कामी आल्या होत्या. शनिवारी दुपारी पंढरपूरच्या वेशीवर विसावा मंदिर इसबावी येथे दाखल झाल्या.
वारकऱ्यांच्या स्नानासाठी चंद्रभागेत मुबलक पाणी
आषाढी यात्रेकरिता आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर, दर्शन राग व उपनगरीय भाग गजवाजला आहे. दर्शनरांगेत तीन लाखांहून अधिक भाविक आहेत. एका मिनिटाला जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळत आहे. दर्शनासाठी जवळपास आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण पढरपूर यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वत सर्व पालखी सोहळ्याचे स्वा करण्यात आले. शहरावर सीसीटीव्ही कॅगेन्याची करडी नजर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, वालुका प्रशासन याच्या वतीने वारीत येणाऱ्या लाखो भाविकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.