Sunday, July 6, 2025

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने
कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. यानंतर कल्याणध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तणाव वाढला. सोशल मीडिया पोस्टचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला.

मनसेच्या रोहन पवार नावाच्या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमधील भाषेविषयी आक्षेप घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी रोहन पवार विरोधात गुन्हा नोंदवला. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. यानंतरही कल्याणमध्ये तणाव कायम आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >