Sunday, July 6, 2025

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून रोजी मिलानमधील 'स्प्रिंग/समर मेन्स कलेक्शन 'मध्य सादर केल्यानंतर निर्माण झालेला वाद आता खूप चाढला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर काही दिवसांनी कंपनीने मौन सोडले असतानाच, कोल्हापुरी चप्पलांच्या कारागीरांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी उच्व न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 'प्राडा'ने मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेल्या 'टो-रिंग' फूटवेअर म्हणजे कोल्हापूर चप्पलांची कोपी आहे. या कंपनीने आपल्या चपला बाजारात आणताना एक निवेदन जाहीर करत त्यात संबंधित उत्पादनामागील प्रेरणा भारतीय कारागिरांकडून घेतल्याचे नमूद केले होते.


या सँडल्सच्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त कोल्हापुरी चपलांशी ठळक साम्य आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये १ लाखाहून अधिक किंमत असलेल्या या सँडलचे प्रदर्शन करण्यात आले. या चप्पलांचे खरे मूळ मान्य न करता त्याचे युरोपियन लेबलखाली पुन्हा अँड करण्यात आले आहे. तसे करून कंपनीने भारतीय कारागीरांच्या आर्थिक व मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे, असे प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे पांच्यासह अन्य वकिलांनी जनहित माचिकेद्वारे न्यायालमाच्या निदर्शनास आणले. कोल्हापुरी चप्पलांशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. ब्रेडने यासंदर्भात दिलेली कबुली ना सार्वजनिक होती ना अधिकृत, ती केवळ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतरच देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी इटालियन लक्झरी बँडने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Comments
Add Comment