
इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ?
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. दुसरी कसोटी कोण जिंकणार हे पाचव्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनच्या मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत शेवटच्या दिवशी ५३६ धावा करण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. बाकीचे फलंदाज मिळून ही कामगिरी पार पाडू शकले तर इंग्लंड मालिकेत २ - ० अशी आघाडी घेईल. सामना भारताने जिंकला तर १ - १ अशी बरोबरी होईल आणि तिसऱ्या कसोटीची चुरस वाढेल. सामना अनिर्णित राहिला तर इंग्लंडची १ - ० ही आघाडी कायम राहील. निर्णायक डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली शून्यावर, बेन डकेट २५ धावांवर आणि जो रूट सहा धावांवर बाद झाला आहे.
चौथ्या दिवसअखेर धावफलक
भारत 587 आणि 427/6 डाव घोषित
इंग्लंड 407 आणि 72/3 (16)