Friday, October 24, 2025
Happy Diwali

'बाळासाहेबांच्या काळातही ७० - ७४ आमदार निवडून यायचे'

'बाळासाहेबांच्या काळातही ७० - ७४ आमदार निवडून यायचे'
लातूर : ठराविक प्रसारमाध्यमांकडून ठाकरे ब्रँडची चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात २८८ आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही ७० - ७४ आमदार निवडून यायचे, असे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले. सध्याच्या राजकारणात नेता जनतेशी किती जोडलेला आहे हे महत्त्वाचे आहे. जनतेची किती कामं करतो हे पण महत्त्वाचं आहे; असेही बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
Comments
Add Comment