
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या २४९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना बहुचर्चित वन बिग ब्युटीफूल कायदा लागू केला आहे. त्यातच त्यांचे माजी सहकारी आणि उद्योगपती एलॉन मस्क यांनी 'अमेरिका पार्टी' नावाने नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी हे म्हटले की हा पक्ष अमेरिकेच्या लोकांना एका पक्ष सिस्टीममधून मुक्ती मिळवून देईल. मस्क यांच्या घोषणेनंतर अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा एक्सवर केली आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले, आज अमेरिका पक्षाची स्थापना तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे.
त्यांनी दावा केलाय की सर्वेक्षणात २:१च्या सरासरीने जनतेने आणखी एक राजकीय पर्याय असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुम्हाला आणखी एक राजकीय पक्ष हवा होता आणि आता हा पक्ष तुमच्यासमोर आहे.
का केली पक्षाची स्थापना?
आपल्या घोषणेत मस्क यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका केली. ते म्हणाले, जेव्हा दारिद्र्य आणि भ्रष्टाचारामुळे आपला देश दिवाळखोरीच्या दिशेने जात असेल तर आपण एक पक्ष सिस्टीममध्ये आहोत.लोकशाहीमध्ये नाही. मस्क यांनी ४ जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोल पोस्ट केला. यात त्यांनी आपल्या फॉलोअर्सना विचारले की, स्वातंत्र्यदिनी विचारणे ही एक योग्य वेळ आहे. तुम्हाला दोन पक्ष सिस्टीममधून स्वातंत्र्यता हवी आहे का? आम्ही अमेरिका पार्टी बनवली पाहिजे का?
Independence Day is the perfect time to ask if you want independence from the two-party (some would say uniparty) system!
Should we create the America Party?
— Elon Musk (@elonmusk) July 4, 2025
या पोलमध्ये ६५.४ टक्के लोकांनी हो असे मतदान केले. तर ३४.६ टक्के लोकांनी नाही यासाठी मतदान केले. मस्क यांनी हे मजबूत समर्थन आपल्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यामागचे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे.